सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:50 IST2026-04-28T14:49:36+5:302026-04-28T14:50:33+5:30
India China direct flight IndiGo 2026: भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा ४ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले असून एअर चायनानेही दिल्ली-बीजिंग विमान सेवा सुरू केली आहे.

सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
कोरोना महामारीच्या काळापासून बंद असलेली भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा आता पूर्णपणे पूर्वपदावर येत आहे. इंडिगो एअरलाईनचे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून थेट चीनच्या ग्वांगझू शहरात उतरले आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
इंडिगो आणि एअर चायनाचा पुढाकार:
दिल्ली ते ग्वांगझू आणि २९ मार्चपासून कोलकाता ते शांघाय अशी थेट सेवा इंडिगोने सुरू केली आहे. तर दिल्ली ते बीजिंग ही सेवा आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) उपलब्ध असेल. एअर चायनाचे विमान बीजिंगहून दुपारी ३:१५ ला उड्डाण करून रात्री ८:२० ला दिल्लीत पोहोचेल. या प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट साधारणपणे ५२३ डॉलर्स असेल.
इतर शहरांमधूनही उड्डाणे सुरू...
केवळ दिल्लीच नाही, तर भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांतूनही चीनसाठी विमाने उडू लागली आहेत. मार्चमध्ये 'चायना ईस्टर्न एअरलाईन्स'ने कुनमिंग ते कोलकाता सेवा सुरू केली. नोव्हेंबरपासून नवी दिल्ली ते शांघाय अशीही सेवा कार्यान्वित झाली आहे.
या निर्णयाचे महत्त्व
थेट विमान सेवेमुळे दोन्ही देशांमधील प्रवासाचा वेळ वाचणार असून, कनेक्टिंग फ्लाईट्सचा त्रास कमी होणार आहे. यामुळे व्यापारी संबंध अधिक दृढ होतील आणि पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल.