Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत

Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत

Post Office Investment Scheme: प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते की आपल्या पैशांवर जोखीम शून्य असावी आणि परतावा भरपूर मिळावा. जर तुम्हीही अशाच सुरक्षित आणि फायदेशीर योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:45 IST2026-04-28T14:41:13+5:302026-04-28T14:45:15+5:30

Post Office Investment Scheme: प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते की आपल्या पैशांवर जोखीम शून्य असावी आणि परतावा भरपूर मिळावा. जर तुम्हीही अशाच सुरक्षित आणि फायदेशीर योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Post Office mis investment scheme Invest once and get rs 9250 every month Get full money back after 5 years | Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत

Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत

Post Office Investment Scheme: प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते की आपल्या पैशांवर जोखीम शून्य असावी आणि परतावा भरपूर मिळावा. जर तुम्हीही अशाच सुरक्षित आणि फायदेशीर योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये मिळतील. विशेष म्हणजे, ५ वर्षांनंतर तुम्ही तुमची मूळ रक्कम परतही मिळवू शकता.

काय आहे ही मंथली इनकम स्कीम ?

आम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम (MIS) बद्दल बोलत आहोत. ही योजना गुंतवणूकदारांना दरमहा गॅरंटीड परतावा देते आणि तुमची गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. ज्यांना जोखीम न पत्करता गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो आणि एक वर्षानंतर पैसे काढण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे.

₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold

ही योजना कशी काम करते?

या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांची आहे. मुदत पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे पूर्ण पैसे काढू शकता. वैयक्तिकरित्या एक व्यक्ती ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. तर, तीन लोक मिळून संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावानेही हे खातं उघडू शकतात.

दरमहा किती परतावा मिळणार?

जर एखाद्या व्यक्तीने ९ लाख रुपये गुंतवले, तर त्याला पुढील ५ वर्षांसाठी दरमहा ५,५५० रुपये मिळतील. म्हणजेच वार्षिक ६६,६०० रुपये परतावा मिळेल. जर तीन लोकांनी मिळून १५ लाख रुपये गुंतवले, तर दरमहा ९,२५० रुपये परतावा मिळणं सुरू होईल. या हिशोबात तुम्हाला वर्षाला १.११ लाख रुपये मिळतील. ५ वर्षांनंतर तुम्ही तुमची मूळ १५ लाख रुपयांची रक्कम परत काढू शकता.

योजनेची खास वैशिष्ट्यं

मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूकदाराला १ वर्षानंतरच पैसे काढण्याचा पर्याय मिळतो. तुम्हाला हवं असल्यास ५ वर्षांनंतर पूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत मिळणारं व्याज दरमहा आपोआप गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा केलं जातं. या योजनेत परतावा जरी खूप जास्त नसला, तरी गुंतवणुकीला पूर्ण सुरक्षा मिळते.

Web Title : पोस्ट ऑफिस योजना: एक बार निवेश करें, ₹9,250 मासिक पाएं, मूलधन वापस!

Web Summary : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम गारंटीड रिटर्न और मूलधन सुरक्षा प्रदान करती है। एक बार निवेश करें, ₹9,250 मासिक प्राप्त करें, और 5 साल बाद अपना प्रारंभिक निवेश वापस पाएं। व्यक्ति ₹9 लाख तक, या संयुक्त रूप से ₹15 लाख तक निवेश कर सकते हैं। जोखिम से बचने वाले निवेशकों के लिए एक सुरक्षित, विश्वसनीय विकल्प।

Web Title : Post Office Scheme: Invest Once, Get ₹9,250 Monthly, Principal Returns!

Web Summary : The Post Office Monthly Income Scheme offers guaranteed returns and principal safety. Invest once, receive ₹9,250 monthly, and get your initial investment back after 5 years. Individuals can invest up to ₹9 lakhs, or ₹15 lakhs jointly. A safe, reliable option for risk-averse investors.