चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:45 IST2026-04-28T14:43:21+5:302026-04-28T14:45:38+5:30

Vande Bharat Cargo: लवकरच वंदे भारत कार्गो ट्रेन सेवेत येऊ शकते. याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे.

indian railway first vande bharat cargo train to be launched soon testing to start know all details | चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?

चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?

Vande Bharat Cargo: भारतीय रेल्वेची वंदे भारत संकल्पना प्रचंड सुपरहिट झाली आहे. वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेचा एक नवीन ब्रँड म्हणून उदयास आली आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुमारे १६४ मार्गांवर सुरू आहे. वंदे भारत ट्रेन प्रवाशांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, सुरक्षा व आलिशान सुविधा पुरवते. वंदे भारत चेअर कार, वंदे भारत स्लीपर या सेवा सुरू असून, वंदे भारत मेट्रोचाही विस्तार करण्याचा मानस रेल्वेचा आहे. यासह आता वंदे भारत कार्गो म्हणजे मालवाहतूक करण्यासाठी वंदे भारत संकल्पनेची मदत घेतली जात आहे. 

भारतीय रेल्वेने वंदे भारत कार्गो या ट्रेनचे प्रोटोटाइप तयार केले असून, याच्या चाचणीला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत कार्गो ट्रेनची चाचणी यशस्वी झाल्यास भारतीय रेल्वेत मालवाहतुकीचा एक नवीन अध्याय सुरू होईल, असे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मालवाहतुकीसाठी विशेष मार्गही सुरू करण्यात आले आहेत. याचा प्रचंड मोठा फायदा रेल्वेला गेल्या काही वर्षांत झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारतीय रेल्वे वंदे भारत कार्गो सेवेत आणली जाणार आहे. 

पहिल्या वंदे भारत कार्गोची चाचणी सुरू

पहिल्या वंदे भारत कार्गोची चाचणी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी ताशी १६० किलोमीटर वेगाने २६४ टनांपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता आहे. दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसारख्या व्यस्त मार्गांवर वंदे भारत कार्गो सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वंदे भारत कार्गोला १६ डबे असतील. भारतीय रेल्वे 'वंदे भारत कार्गो' सुरू करण्यासाठी मालवाहतूक प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. याचा प्रोटोटाइप चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आला आहे. रेल्वेची संशोधन शाखा, आरडीएसओ, सुरक्षा आणि इतर मापदंडांवर चाचणी करणार आहे. 'वंदे भारत कार्गो' सुरू करून भारतीय रेल्वेचा मालवाहतुकीला गती देण्याचा आणि कमी खर्चात एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत मालाची सहज वाहतूक करणे हा उद्देश आहे. यामुळे नाशवंत मालाची नासाडी टाळण्यासही मदत होईल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा प्रोटोटाइप इंटिग्रल कोच फॅक्टरीने (ICF) विकसित केला आहे. वंदे भारत कार्गो कार्यान्वित होण्यापूर्वी, तिचा वेग, आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली आणि भार वाहून नेण्याची क्षमता यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. या चाचण्यांमध्ये या हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनची सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांचेही मूल्यांकन केले जाईल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title : वंदे भारत कार्गो: भारतीय रेलवे जल्द शुरू करेगी माल ढुलाई सेवा

Web Summary : भारतीय रेलवे वंदे भारत कार्गो का परीक्षण कर रही है, जो वंदे भारत ट्रेन पर आधारित एक माल ढुलाई सेवा है। 160 किमी प्रति घंटे की गति और 264 टन की क्षमता के साथ, इसका उद्देश्य माल परिवहन का आधुनिकीकरण करना, लागत कम करना और खराब होने वाले सामानों की बर्बादी को कम करना है। गति, ब्रेकिंग और भार क्षमता का आकलन करने के लिए परीक्षण चल रहे हैं।

Web Title : Vande Bharat Cargo: Indian Railways to Launch Freight Service Soon

Web Summary : Indian Railways is testing Vande Bharat Cargo, a freight service based on the successful Vande Bharat train. Capable of 160 kmph and 264-tonne capacity, it aims to modernize freight transport, reduce costs, and minimize perishable goods wastage. Trials are underway to assess speed, braking, and load capacity.