रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:30 IST2026-04-28T14:29:42+5:302026-04-28T14:30:17+5:30

Gujarat local body election result 2026: गुजरात स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपने १० महानगरपालिका जिंकल्या आहेत. मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नयनाबा जडेजा यांचा राजकोटमधून पराभव झाला आहे. वाचा सविस्तर निकाल.

Gujarat local body election result 2026: Ravindra Jadeja's sister contested on Congress ticket, lost! BJP controls 10 municipal corporations in Gujarat | रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा

रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत १५ पैकी १० महानगरपालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची बहीण नयनाबा जडेजा यांना राजकोटमधून काँग्रेसच्या तिकिटावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. जडेजाची पत्नी भाजपाची आमदार आहे. सूरत महानगरपालिकेत भाजपने ४३ जागांवर विजय मिळवत किंवा निर्णायक आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

भुजमध्ये ओवेसींची एन्ट्री...
असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM ने भुज नगरपालिकेत ३ जागा जिंकून गुजरातमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. 

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानासाठी ४ कोटी १८ लाखांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे राहिली:

महानगरपालिका: ५५.१%

नगरपालिका: ६५.५३%

जिल्हा पंचायत: ६६.६४%

तालुका पंचायत: ६७.२६%

ऐतिहासिक पार्श्वभूमी:
२०२१ च्या निवडणुकीत भाजपने ८,४७० जागांपैकी ६,२३६ जागा जिंकून मोठे यश मिळवले होते. तेव्हा आम आदमी पक्षाने सूरतमध्ये २७ जागा जिंकून 'तिसरी शक्ती' म्हणून प्रवेश केला होता. यावर्षी 'आप' ५,००० जागांवर निवडणूक लढवत असून त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : गुजरात स्थानीय चुनावों में भाजपा का दबदबा; जडेजा की बहन कांग्रेस टिकट पर हारीं।

Web Summary : भाजपा ने गुजरात में स्थानीय सत्ता बरकरार रखी, 15 में से 10 निगम जीते। रवींद्र जडेजा की बहन कांग्रेस के टिकट पर चुनाव हार गईं। एआईएमआईएम ने भुज में 3 सीटें हासिल कीं।

Web Title : BJP Dominates Gujarat Local Elections; Jadeja's Sister Loses on Congress Ticket.

Web Summary : BJP retained Gujarat's local power, winning 10 of 15 corporations. Ravindra Jadeja's sister lost contesting on a Congress ticket. AIMIM secured 3 seats in Bhuj.