प्रियंका चोप्राला लागला मोठा जॅकपॉट! 'वाराणसी'नंतर 'या' बायोपिकमध्ये दिसणार 'देसी गर्ल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:16 IST2026-04-28T13:12:24+5:302026-04-28T13:16:42+5:30

एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या चित्रपटानंतर आता प्रियंकाच्या हाती एक मोठा बायोपिक लागला आहे.

Priyanka Chopra Amrita Sher Gil Biopic Amri Mira Nair Varanasi Update | प्रियंका चोप्राला लागला मोठा जॅकपॉट! 'वाराणसी'नंतर 'या' बायोपिकमध्ये दिसणार 'देसी गर्ल'

प्रियंका चोप्राला लागला मोठा जॅकपॉट! 'वाराणसी'नंतर 'या' बायोपिकमध्ये दिसणार 'देसी गर्ल'

जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या यशाच्या शिखरावर आहे. हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर आता प्रियंका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या चित्रपटानंतर आता प्रियंकाच्या हाती एक मोठा बायोपिक लागला आहे.

'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका चोप्रा २० व्या शतकातील प्रसिद्ध भारतीय-हंगेरियन चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावर आधारित 'अमरी' या बायोपिकमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मीरा नायर करत आहेत. प्रियंका आणि मीरा नायर पहिल्यांदाच या प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.

या चित्रपटात प्रियंका मुख्य भूमिकेत नसून एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृता शेरगिल यांची मुख्य भूमिका अभिनेत्री तान्या मानिकतला ही अभिनेत्री साकारत आहे. मात्र, कथानकातील एका अशा विशिष्ट भूमिकेसाठी मीरा नायर यांना प्रियंकाच हवी होती. यासाठी त्यांनी गेल्या वर्षीच प्रियंकाची भेट घेतली होती. या चित्रपटाचे शुटिंग हे भारत, हंगेरी आणि फ्रान्स अशा विविध देशांमध्ये होणार आहे.


'वाराणसी' चित्रपटाचे शुटिंग पूर्ण

प्रियंकाने नुकतेच हैदराबादमध्ये महेश बाबूच्या 'वाराणसी' चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती थेट अमृतसरला पोहोचली. जिथे तिने दोन दिवस 'अमरी' चित्रपटासाठी शूट केले. सध्या निर्मात्यांनी प्रियंकाच्या भूमिकेबद्दल कमालीची गुप्तता पाळली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर प्रियंका हिंदी चित्रपटांत कमबॅक करत असल्याने तिचे चाहते तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Web Title : प्रियंका चोपड़ा को 'वाराणसी' के बाद मिली बायोपिक भूमिका।

Web Summary : प्रियंका चोपड़ा मीरा नायर द्वारा निर्देशित अमृता शेरगिल की बायोपिक 'अमरी' में अभिनय करेंगी। वह तान्या मानिकतला के साथ एक महत्वपूर्ण भूमिका निभाएंगी। शूटिंग भारत, हंगरी और फ्रांस में होगी। प्रियंका ने हाल ही में 'वाराणसी' की शूटिंग पूरी की।

Web Title : Priyanka Chopra lands biopic role after 'Varansi' film success.

Web Summary : Priyanka Chopra will star in 'Amri,' a biopic about Amrita Shergil, directed by Mira Nair. She will play a significant role alongside Tanya Maniktala. Shooting locations include India, Hungary, and France. Priyanka recently wrapped up shooting for 'Varansi'.