यशच्या 'टॉक्सिक'चं प्रदर्शन टळलं; आता ४ जूनला रिलीज होणार नाही सिनेमा, निर्मात्यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:04 IST2026-04-29T12:46:34+5:302026-04-29T13:04:15+5:30

'टॉक्सिक' चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. स्वतः यशने बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

Yash Toxic The film will not be released date postponed makers have revealed the reason | यशच्या 'टॉक्सिक'चं प्रदर्शन टळलं; आता ४ जूनला रिलीज होणार नाही सिनेमा, निर्मात्यांनी सांगितलं कारण

यशच्या 'टॉक्सिक'चं प्रदर्शन टळलं; आता ४ जूनला रिलीज होणार नाही सिनेमा, निर्मात्यांनी सांगितलं कारण

'KGF' फेम सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. स्वतः यशने बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

४ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार नाही

गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आधी १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' सोबत होणारी टक्कर टाळण्यासाठी प्रदर्शनाची तारीख ४ जून निश्चित करण्यात आली होती. आता यशने स्पष्ट केले आहे की, ४ जून रोजी देखील हा चित्रपट चित्रपटगृहात येणार नाही. विशेष म्हणजे, यावेळी नवीन रिलीज डेटबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांची आणखी निराशा झाली आहे.


चित्रपटाचा अभिनेता आणि सह-निर्माता असलेल्या यशने एका सविस्तर निवेदनात म्हटले आहे की, "काही चित्रपट आपण बनवतो आणि काही चित्रपट आपल्याला सिनेमावर प्रेम का करावे, याची आठवण करून देतात. 'टॉक्सिक'चा प्रवासही असाच राहिला आहे. CinemaCon मध्ये आमचा चित्रपटाला जगभरातून जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून आमचा यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. याशिवाय हा चित्रपट जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पात्र आहे, याचीही आम्हाला खात्री वाटतेय."

तो पुढे म्हणाला, "'टॉक्सिक'चे काम आता पूर्ण झाले आहे. सध्या आम्ही जागतिक स्तरावर वितरण (Distribution) आणि पार्टनरशिपला अंतिम स्वरूप देत आहोत. त्यामुळेच आम्ही प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ४ जूनला चित्रपट प्रदर्शित करणार नाही. याशिवाय जागतिक सिनेसृष्टीच्या बाजाराचा विचार करून लवकरच एका नवीन तारखेची घोषणा करू."

देशातील सर्वात महागडा चित्रपट

'टॉक्सिक' हा एक पीरियड गँगस्टर ड्रामा असून यात यश दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल ₹७०० ते ८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरणार आहे. चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत अशी तगडी स्टारकास्ट आहे.

याआधी जेव्हा 'टॉक्सिक'चे १९ मार्चचे प्रदर्शन पुढे गेले होते, तेव्हा निर्मात्यांनी इराण-इस्रायल युद्धाचा संदर्भ देत आखाती देशांमधील बिघडलेल्या परिस्थितीचे कारण दिले होते. मात्र, यावेळी प्रदर्शनाची तारीख का लांबणीवर टाकली, याचे कोणतेही विशेष असे ठोस कारण देण्यात आलेले नाही. यशने केवळ 'जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पाडण्यासाठी वेळ हवा आहे' असे म्हटले आहे.

Web Title : यश की 'टॉक्सिक' की रिलीज में देरी; नई तारीख का इंतजार, कारण बताए गए।

Web Summary : यश की बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' की रिलीज फिर से स्थगित हो गई है। फिल्म, जो शुरू में 4 जून को रिलीज होने वाली थी, को और देरी का सामना करना पड़ रहा है क्योंकि निर्माता वैश्विक वितरण और साझेदारी चाहते हैं। जल्द ही एक नई रिलीज की तारीख की घोषणा की जाएगी, जिससे प्रशंसक निराश हैं। फिल्म एक पीरियड गैंगस्टर ड्रामा होने की उम्मीद है।

Web Title : Yash's 'Toxic' release delayed; new date awaited, reasons cited.

Web Summary : Yash's highly anticipated 'Toxic' release is postponed again. The film, initially slated for June 4th, faces further delays as producers seek global distribution and partnerships. A new release date will be announced soon, leaving fans disappointed. The movie is expected to be a period gangster drama.