Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:15 IST2026-04-29T10:12:39+5:302026-04-29T10:15:55+5:30

Mumbai Mira Road Stabbing Case: मिरा रोड येथील घटनेने संपूर्ण राज्य हादरवून सोडले असतानाच, या प्रकरणातील मुख्य आरोपी जैब जुबैर याच्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती समोर आली.

Mira Road Case: From US Education to Radicalization; How Family Rejection and Lone Wolf Ideology Led Jaib to Terror | Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?

Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?

मिरा रोड येथील घटनेने संपूर्ण राज्य हादरवून सोडले असतानाच, या प्रकरणातील मुख्य आरोपी जैब जुबैर याच्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत शिक्षण घेतलेला आणि तिथेच स्थायिक असलेला जैब गुन्हेगारी विचारांकडे कसा वळला? याचा उलगडा आता होऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैब हा मूळचा सुशिक्षित असून त्याचे संपूर्ण शिक्षण अमेरिकेत झाले. त्याचे आई-वडील आणि दोन बहिणी सध्या अमेरिकेतच स्थायिक आहेत. मात्र, जैबच्या आयुष्यात वादळ आले, जेव्हा त्याच्या घरातल्यांनी त्याला बाहेर काढले. इतकेच नव्हे तर, त्याच्या पत्नीनेही त्याची साथ सोडली. कौटुंबिक छळ किंवा वैयक्तिक वादामुळे तो पूर्णपणे एकाकी पडला.

घरातून हकालपट्टी झाल्यानंतर जैब मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्याला आला. मात्र, येथे त्याला एका वेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागला. बॅचलर असल्याने त्याला परिसरात घर मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घर न मिळण्यामागे आपल्या धर्माचा संबंध जोडत मुंबईत मुस्लीम समाजावर अन्याय होत आहे,अशी टोकाची भावना त्याच्या मनात घर करू लागली. याच मानसिक तणावातून आणि नैराश्यातून तो नकारात्मकतेच्या गर्तेत अडकत गेला.

एकटा पडलेल्या जैबने आपला वेळ सोशल मीडियावर घालवण्यास सुरुवात केली. यादरम्यान तो दहशतवादी संघटनांच्या संबंधित व्हिडीओ पाहू लागला. त्याने विविध कट्टरपंथी नेत्यांची भाषणे ऐकून स्वतःला त्या विचारांशी जोडून घेतले. सोशल मीडियावर उपलब्ध असलेले दहशतवादी कारवायांचे व्हिडिओ पाहून तो प्रेरित झाला. महत्त्वाचे म्हणजे, जैबने अमेरिकेतील लोन वुल्फ घटनेचा व्हिडीओ पाहून मिरा रोडचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणा आता जैबच्या सोशल मीडिया अकाउंट्सची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसून चौकशी करत आहेत.

Web Title : मीरा रोड हत्याकांड: परिवार ने निकाला, पत्नी ने छोड़ा; आरोपी का अशांत अतीत

Web Summary : मीरा रोड हत्याकांड का आरोपी जैब, अमेरिका में शिक्षित, पारिवारिक अस्वीकृति और तलाक का सामना करना पड़ा। अकेला होकर, वह मुंबई चला गया, आवास ढूंढने के लिए संघर्ष किया, और ऑनलाइन कट्टरपंथी बन गया, संभावित रूप से लोन वुल्फ हमलों से प्रेरित। जांच जारी है।

Web Title : Mira Road Murder: Family Ousted, Wife Left; Accused's Troubled Past

Web Summary : Mira Road murder accused, Jaib, educated in America, faced family rejection and divorce. Isolated, he moved to Mumbai, struggled finding housing, and became radicalized online, potentially inspired by lone wolf attacks. Investigation ongoing.