PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये

Babar Azam Century Pakistan Cricket PSL 2026: बाबर आझमच्या खेळीच्या जोरावर संघाचा दमदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:44 IST2026-04-29T09:42:14+5:302026-04-29T09:44:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PSL 2026 Babar Azam record century completed ton with six after 7 years peshawar zalmi into finals | PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये

PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये

Babar Azam Century Pakistan Cricket: पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बाबर आझमने आपल्या बॅटने पुन्हा एकदा कमाल दाखवली. बाबरच्या शानदार शतकाच्या जोरावर पेशावर झल्मीने इस्लामाबाद युनायटेडचा पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्याचे मुख्य आकर्षण बाबप आझमचे शतक होते. त्याने केलेल्या खेळीमुळे जुना बाबर क्रिकेटचा मैदानात परतला असल्याची भावना पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली. या सामन्यात एका खास कारणामुळे तब्बल ७ वर्षांपूर्वीचा बाबर पाहायला मिळाला.


बाबर आझमचा शतकी धमाका; सात वर्षांनी पुन्हा तोच पराक्रम

या महत्त्वपूर्ण सामन्यात बाबर आझमने अवघ्या ५९ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. हे बाबर आझमचे पीएसएल कारकिर्दीतील एकूण सहावे शतक ठरले. या शतकासह त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. त्याने षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले. महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल सात वर्षानंतर बाबर आझमने अशा प्रकारे आपले शतक षटकार लगावत पूर्ण केले. याआधी काउंटी क्रिकेटमध्ये सोमरसेटकडून खेळताना २०१९ मध्ये त्याने असा पराक्रम केला होता.


संघाला मिळवून दिला निर्णयाक विजय

बाबरच्या शतकी खेळीमुळे पेशावर झल्मीने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून २०५ धावांचे आव्हान उभे केले होते. आव्हानाचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेडचा संघ ठराविक अंतराने विकेट्स गमावत राहिल्यामुळे लक्ष्यापासून दूर राहिला. या विजयामुळे पेशावर झल्मी संघ पीएसएल २०२६च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता त्यांचा सामना एलिमिनेटर फेरीत जिंकणाऱ्या संघाशी अंतिम फेरीत होईल. बाबर आझमने कर्णधारपदाचा साजेशी खेळी केल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आता अंतिम फेरीतही त्याच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title : बाबर आज़म के शतक से पेशावर ज़ल्मी PSL 2026 के फाइनल में।

Web Summary : बाबर आज़म के शानदार शतक की बदौलत पेशावर ज़ल्मी ने इस्लामाबाद यूनाइटेड को हराकर PSL 2026 के फाइनल में जगह बनाई। आज़म के नाबाद 103 रनों की पारी ने टीम को महत्वपूर्ण जीत दिलाई और फाइनल में पहुंचाया।

Web Title : Babar Azam's century propels Peshawar Zalmi into PSL 2026 final.

Web Summary : Babar Azam's explosive century powered Peshawar Zalmi to the PSL 2026 final, defeating Islamabad United. Azam's unbeaten 103 off 59 balls marked his sixth PSL century. He finished the century with a six after seven years, securing a crucial victory.