महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:57 IST2026-04-29T09:33:17+5:302026-04-29T09:57:33+5:30

न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीत गुंगीकारक औषधाचा तपास करणे बाकी असल्याने खरातला पोलिस कोठडी मिळावी, असे तपास यंत्रणा सांगते. मात्र आजपर्यंत त्या दृष्टीने ठोस काही हाती लागलेले नाही.

The SIT has yet to succeed in identifying the sedative administered to victims in the case involving the Ashok Kharat | महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?

महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?

नाशिक - भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना दिल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधाचा तपास लावण्यात एसआयटीला अद्यापही यश आले नसून हे औषध कोणते, ते खरात कुठून मागवत होता याबद्दल गूढ कायम आहे.

नाशिकमधील भोंदू खरातविषयी अनेक पीडितांनी शारीरिक शोषणाच्या तक्रारी केल्या. त्यात त्यांनी गुंगीकारक औषध दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे एसआयटीने हे गुंगीकारक औषध शोधण्यासाठी शहरातील दोन डॉक्टरांची चौकशीही केली होती. खरातच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रापर्टी या कार्यालयातून औषधाची एक रिकामी बाटलीही ताब्यात घेण्यात आली होती. खरातने दिलेले पाणी प्यायल्यावर चक्कर येणे, मळमळ होणे व ते प्यायल्यावर स्वत:ची शुद्ध हरपणे अशा तक्रारी पीडित महिलांनी केल्या होत्या. न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीत गुंगीकारक औषधाचा तपास करणे बाकी असल्याने खरातला पोलिस कोठडी मिळावी, असे तपास यंत्रणा सांगते. मात्र आजपर्यंत त्या दृष्टीने ठोस काही हाती लागलेले नाही.

पीडित महिलांची तक्रार
पीडित महिला खरातने दिलेले पाणी प्यायल्यावर  त्याच्या तालावर नाचत असत, असे पीडितांनी तक्रारीत म्हटले आहे. महिलांना तो नक्की कोणते द्रव पाजायचा, ते मळकट रंगाचे व चवीला बरोबर नसलेले द्रव काय होते आणि तो ते कोठून आणायचा, याचा शोध सलग सातव्या गुन्ह्यातही पोलिसांना लागलेला नाही. 

फॉरेन्सिक अहवालातही  अद्याप स्पष्टता नाही
खरातला पोलिस कोठडी मिळण्यासाठी (रिमांड रिपोर्ट) अनेक कारणे एसआयटीचे अधिकारी देतात. त्यात गुंगीकारक औषधाचा तपास हे एक कारण असले तरी याबाबत अद्याप स्पष्टता झाली 

Web Title : महिलाओं को नचाने वाली दवा का रहस्य; खराट कौन सा तरल पिलाता था?

Web Summary : धोखेबाज खराट द्वारा इस्तेमाल की गई दवा की पहचान करने में पुलिस संघर्ष कर रही है। पीड़ितों ने इसे पीने के बाद नियंत्रण खोने का वर्णन किया। जांच और फोरेंसिक रिपोर्ट के बावजूद, तरल अज्ञात है, जिससे मामला बाधित हो रहा है।

Web Title : Mystery surrounds drug making women dance; what liquid did Kharat use?

Web Summary : Police struggle to identify the drug used by fraudster Kharat. Victims describe losing control after drinking it. Despite investigations and forensic reports, the liquid remains unidentified, hindering the case.