Share Market Today: शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळी उत्साह पाहायला मिळाला. जागतिक बाजारपेठेतून मिळणारे सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजार आज ग्रीन झोनमध्ये उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांच्या उसळीसह ७७,२३७ च्या पातळीवर व्यवहार करत आहे, तर निफ्टी देखील १०० हून अधिक अंकांची वाढ करून २२,५०० ची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे.
या शेअर्सनी पकडला वेग
बाजाराच्या या तेजीमध्ये बँकिंग आणि ऑटो सेक्टरचा मोठा वाटा आहे. बंधन बँकेच्या शेअर्समध्ये आज चमक दिसून येत आहे, कारण कंपनीचा नफा ६८% वाढून ₹५३४.१ कोटी झालाय. याशिवाय, CEAT च्या शेअर्समध्येही मोठी हालचाल आहे, ज्याचा नफा १४५% च्या प्रचंड वाढीसह ₹२४३.८५ कोटींवर पोहोचलाय. टायर्स आणि बँकिंग क्षेत्रातील या मजबूत आकडेवारीनं बाजाराच्या सेंटिमेंटला मोठी चालना दिली.
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
आज येणार या दिग्गज कंपन्यांचे निकाल
आज बाजाराचं लक्ष १५ हून अधिक मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक निकालांवर असेल. यामध्ये बजाज फायनान्स, अदानी पॉवर, वेदांता आणि इंडियन ओव्हरसीज बँक सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे निकाल दुपारनंतर किंवा बाजार बंद होण्याच्या वेळी येतील, ज्याचा परिणाम येणाऱ्या दिवसांत शेअर्सच्या किमतींवर स्पष्टपणे दिसेल.
विमा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही उत्साह
आज गुंतवणूकदार स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि गो डिजिटच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकतात. स्टार हेल्थचा नफा सर्व रेकॉर्ड मोडत ₹१११.३ कोटींवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो केवळ ₹५० लाख होता. दुसरीकडे, अदानी विल्मरच्या ॲग्रीकल्चर बिझनेसमध्येही ५३% नफा वाढल्यानं गुंतवणूकदार आकर्षित झालेत.
