"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:21 IST2026-04-30T15:19:36+5:302026-04-30T15:21:12+5:30
Mumbai Agripada Crime: मुंबईतील अग्रिपाडा परिसरातील बेबी गार्डन भागात एका तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले.

"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
मुंबईतील अग्रिपाडा परिसरातील बेबी गार्डन भागात अत्यंत खळबळजनक घटना घडली. केवळ हसत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेबी गार्डन परिसरातील एका दुकानासमोर पीडित तरुण आपल्या भावासोबत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी आरोपी फिरोज मन्सुरी हा काही वस्तू खरेदी करण्यासाठी तिथे आला. त्या दोन भावांना एकमेकांशी बोलताना आणि हसताना पाहून, फिरोजला असा गैरसमज झाला की, ते त्याची चेष्टा करत आहेत आणि त्याच्यावर हसत आहेत.त्यानंतर फिरोजने आपल्या पिशवीतून चाकू काढला आणि पीडित तरुणावर सपासप वार केले. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला. स्वत:चा बचाव करताना त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी अग्रिपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुप्तचर माहितीचा वापर करून, पोलिसांनी आरोपी फिरोज मन्सुरीला अवघ्या काही तासांतच अटक केली. आरोपीची यापूर्वी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? किंवा तो कोणत्याही मानसिक तणावाखाली होता का? याचा पोलीस तपास करीत आहेत.