अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:59 IST2026-04-30T14:55:14+5:302026-04-30T14:59:49+5:30
Indian Artefacts News: अमेरिकेने सुमारे १२० कोटी रुपये किमतीच्या सुमारे ६५७ दुर्मीळ आणि प्राचीन मूर्ती आणि कलाकृती भारताला परत केल्या आहेत. या मूर्ती आर्टफेक्ट इंटरनॅशन तस्करांच्या टोळीने गेल्या काही वर्षात तस्करी करून अमेरिकेत नेल्या होत्या.

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत
भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे अनेक वर्षांपासून परदेशांमध्ये तस्करी सुरू आहे. यामागे अनेक रॅकेट सक्रिय आहेत. दरम्यान, अमेरिकेने सुमारे १२० कोटी रुपये किमतीच्या सुमारे ६५७ दुर्मीळ आणि प्राचीन मूर्ती आणि कलाकृती भारताला परत केल्या आहेत. या मूर्ती आर्टफेक्ट इंटरनॅशन तस्करांच्या टोळीने गेल्या काही वर्षात तस्करी करून अमेरिकेत नेल्या होत्या. अमेरिकेच्या मॅनहॅटन जिल्हा अटॉर्नी कार्यालयाने तस्करीच्या तपासानंतर या कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे १४ दशलक्ष डॉलर किंमत असलेल्या या मूर्ती आणि कलाकृती भारताला परत करण्यात आल्या आहेत. मॅनहॅटनचे जिल्हा अटॉर्नी एल्विन एल ब्रेग ज्युनियर यांनी न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कौन्सिलर राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमामध्ये या मूर्ती परत करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी तस्कर सुभाष कपूर आणि नॅन्सी वीनरशी संबंधित गुन्हेगारी टोळीच्या सुरू असलेल्या तपासादरम्यान, या कलिकृती आणि मूर्ती जप्त केल्या होत्या.