'हे' आहेत 2019मधील टॉप ब्युटी ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:55 PM2019-01-04T16:55:38+5:302019-01-04T17:02:06+5:30

आपण नुकतचं नव्या वर्षात पदार्पण केलं असून मागील वर्षाच्या आठवणी सध्या मनामध्ये घर करून राहिल्या असतील. अशातच आता नवीन वर्षात नवीन गोष्टींचा विचार करत असालच. अनेक गोष्टींप्रमाणे यावर्षी वेगवेगळे क्रिएटिव्ह आणि इनोवेटिव्ह मेकअप टिप्सचा ट्रेन्ड सुरू आहे. जाणून घेऊया 2019मधील क्रिएटिव्ह आणि इनोवेटिव्ह मेकअप टिप्स...

सॅमन पिंक असो किंवा फ्रुट बेरी पिंक. यावर्षी पिंक मेकअप ट्रेन्डमध्ये आहे. कोरिया आणि जपानमध्ये पापण्या, ओठ आणि गालांवर पीच, पिंक, कोरल आणि ब्लश्ड न्यूडचा जास्त वापर होत आहे आणि यावर्षी भारतातही हा पिंक मेकअप धुमाकूळ घालणार आहे.

दाट आणि थिक आयलॅश असणारा लूक मागील वर्षात करायचा राहिला असेल. तर नवीन वर्षात नॅचरल, लाइट आणि फ्लफी आयलॅश असलेला लूक ट्राय करा. सध्या हा लूक ट्रेन्डमध्ये आहे.

आता थिक पेन्सिलचा जमाना असून या नव्या वर्षात ब्रश केलेल्या कॉम्ब लूक असणाऱ्या आयब्रोचा लूक ट्रेन्डमध्ये आहे.

नव्या वर्षात ग्लेज्ड लूक एकदम आउट आहे. त्यामुळे ग्लास स्किन जो मागील वर्षात हिट राहिला या वर्षी नवा लूक त्याची जागा घेणार आहे. ग्‍लॉसी स्किन ऑयली वाटते. त्यामुळे मॅट स्किन यावर्षी हिट आहे कारण मॅट स्किन लूक लाइट रिफ्लेक्ट करण्याऐवजी अब्जॉर्ब करते. मेकअप लेयरखाली तुमच्या स्किनवरील डाग लपून जातात.