Next

थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:03 PM2018-11-03T16:03:12+5:302018-11-03T16:04:24+5:30

परभणी- गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शनिवारी  परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

परभणी- गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शनिवारी  परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी नुकसान होऊनही रिलायन्स विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही. या संदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या वतीने थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी आंदोलन करण्यात येत आहे.