Next

नवा ट्विस्ट, मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार? Sameer Wankhede च्या आत्याची एंट्री! Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:04 PM2021-12-08T14:04:59+5:302021-12-08T14:05:24+5:30

समीर वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही, जाहीर प्रतिक्रिया देणार नाही, असं नवाब मलिक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर वानखेडे-मलिक वाद काही काळासाठी का होईना शांत झाला होता पण आता मलिक-वानखेडे वादात समीर वानखेडेंच्या आत्याची एंट्री झालीय. वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी थेट नवाब मलिकांविरोधात शड्डू ठोकलाय. नवाब मलिकांविरोधात गुंफाबाई औरंगाबाद जिल्हा कोर्टात गेल्यात, तिथे मलिकांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केलीय. मलिक यांच्या आरोपांमुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी होत असल्याची तक्रार गुंफाबाईंनी केलीय. समीर वानखेडे मुस्लिम आहेत आणि त्यांनी खोटं सर्टिफिकेट दाखवून सरकारी नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. हाच आरोप गुंफाबाईंनी खोडून काढलाय, समीर हे आपले सख्खे भाचे आहेत, मुस्लिम नाहीत असा दावा गुंफाबाईंनी केलाय.