युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:50 IST2026-04-21T13:48:15+5:302026-04-21T13:50:32+5:30

Who is Ahmad Vahidi IRGC : मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी इराणच्या कूटनीतीवर ताबा मिळवला आहे. गालिबफ यांच्याशी झालेल्या वादानंतर वाहिदी यांनी अमेरिकेसोबतच्या चर्चेला विरोध केला असून हॉर्मुझवर टोल लावण्याची तयारी सुरू केली आहे.

War or peace? Disagreement! A clash between the Speaker of the Parliament and the IRGC chief; Who is Ahmad Vahidi, Iran's new 'power center'? | युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 

युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 

अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर आता अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. इराणचे संसदेचे सभापती मोहम्मद बाघर गालिबफ आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर मेजर जनरल अहमद वाहिदी यांच्यात तीव्र मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या इराणच्या राजकारणात वाहिदींचे वर्चस्व गालिबफ यांच्यापेक्षा अधिक असल्याचे दिसत असून, वाहिदींचा गट अमेरिकेसोबतच्या कोणत्याही वाटाघाटींना कडाडून विरोध करत आहे.

कोण आहेत अहमद वाहिदी?
IRGC चे सर्वेसर्वा: १ मार्च २०२६ रोजी अहमद वाहिदी यांची IRGC च्या कमांडर-इन-चीफ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कमांडर मोहम्मद पाकपुर यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.

खामेनेईंशी थेट संबंध: इस्रायली मीडियाच्या अहवालानुसार, वाहिदी हे एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांचा सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याशी थेट संपर्क आहे. ते शासनातील इतर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वोच्च नेत्यांचे निर्णय पोहोचवणारे महत्त्वाचे माध्यम बनले आहेत.

कट्टरपंथी इतिहास: वाहिदी हे यापूर्वी इराणचे संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. कासिम सुलेमानी यांच्या आधी त्यांनी 'कुड्स फोर्स'चे नेतृत्व केले होते. हमास आणि हिजबुल्ला यांसारख्या प्रॉक्सी संघटनांवर आजही त्यांची मोठी पकड असल्याचे मानले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉंटेड: १९९४ मध्ये अर्जेंटिनातील AMIA बॉम्बस्फोट प्रकरणात इंटरपोलने त्यांना 'वॉंटेड' घोषित केले असून त्यांच्यावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत.

हॉर्मुझवर टोल वसूल करण्याची तयारी
इराणी संसद सध्या एका नवीन विधेयकाचा मसुदा तयार करत आहे, ज्यानुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या नियंत्रणाला अधिकृत स्वरूप दिले जाईल. या अंतर्गत: या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून 'टोल' (शुल्क) वसूल केला जाईल. इस्रायलशी संबंधित जहाजांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. 'शत्रू देशांच्या' जहाजांना या मार्गावरून जाण्यासाठी इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'ची परवानगी घेणे अनिवार्य असेल.

युद्ध की शांतता?
इराणचे नागरी नेते चर्चेद्वारे तणाव संपवू इच्छितात, मात्र अंतिम निर्णय अहमद वाहिदी यांच्या हातात असल्याचे दिसते. दरम्यान, अमेरिकन नौदलाने इराणची नाकेबंदी सुरूच ठेवली असून आतापर्यंत २७ जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे. नुकतेच अमेरिकेने चीनकडून येणारे एक इराणी जहाजही जप्त केले आहे, ज्यात 'दुहेरी वापराच्या' संशयास्पद वस्तू होत्या.

Web Title : ईरान: युद्ध या शांति? संसद अध्यक्ष और IRGC प्रमुख में टकराव।

Web Summary : ईरान के संसद अध्यक्ष और IRGC प्रमुख के बीच अमरीका से बातचीत को लेकर मतभेद। IRGC वार्ता का विरोध कर रहा है। होर्मुज जलडमरूमध्य पर नियंत्रण के लिए विधेयक, जिसमें टोल और इजरायली जहाजों पर प्रतिबंध शामिल हैं। अमेरिका का नौसैनिक दबाव जारी।

Web Title : Iran: War or Peace? Clash Between Parliament Speaker, IRGC Chief.

Web Summary : Tensions rise as Iran's parliament speaker and IRGC chief clash over US talks. IRGC hardliners oppose negotiations. A new bill eyes control over the Strait of Hormuz, including tolls and restrictions on Israeli ships. The US maintains naval pressure.