एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:41 IST2026-04-21T14:40:14+5:302026-04-21T14:41:53+5:30

Deputy CM Eknath Shinde: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे.

deputy cm eknath shinde kept his promise built a house for adil shah family in pahalgam | एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!

Deputy CM Eknath Shinde: २२ एप्रिल २०२५ हा दिवस भारतासाठी एक काळा दिवस होता. पहलगाम हल्ल्याची घटना या दिवशी घडली. पाकिस्तानातून आलेल्या काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य केले आणि २६ जणांचा जीव घेतला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. या पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दिलेला शब्द पाळला. पहलगाम येथील आदिल शाह यांच्या कुटुंबियांना घर बांधून दिले. यासाठी एकनाथ शिंदे यांनी पदरचे लाखो रुपये खर्च केल्याचे म्हटले जात आहे.

पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी धाडसाने पुढे सरसावलेले आदिल शाह हे दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले होते. आदिल यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले होते. एकीकडे आदिल गेल्याचे दुःख होते, तर दुसरीकडे कुटुंबाचा आधार गेल्याने परिस्थितीही बिकट झालेली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली आणि कुटुंबाला नवीन घर बांधून देण्याचा शब्द दिला होता.  

पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना आदिल शाह यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून नवीन पक्के घर बांधून देण्यात आले. हे घर बांधण्यासाठी सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च आल्याचा दावा केला जात आहे. हे एकमजली घर मजबूत असून त्यामध्ये प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वी आदिल यांचे कुटुंब माती आणि लाकडाच्या जुन्या घरात राहत होते. पर्यटकांनी पुन्हा येथे यावे, घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे, अशी भावना आदिल यांच्या वडिलांनी व्यक्त केली. तसेच शिवसेनेचे आभार मानले. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधितही केले. 

दरम्यान, संकटाच्या त्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आदिल यांनी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांची रायफलही रोखली होती. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आदिल यांच्या शौर्यामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचले, असे आदिल यांच्या भावाने सांगितले.

Web Title : एकनाथ शिंदे ने वादा निभाया: पहलगाम में आदिल के परिवार के लिए घर बनवाया

Web Summary : एकनाथ शिंदे ने पहलगाम हमले में पर्यटकों को बचाते हुए शहीद हुए आदिल शाह के परिवार के लिए घर बनवाकर अपना वादा पूरा किया। ₹12 लाख की लागत से बने इस घर से परिवार को बेहतर जीवन मिलेगा।

Web Title : Eknath Shinde Fulfills Promise: Builds Home for Adil's Family in Pahalgam

Web Summary : Eknath Shinde honored his promise by building a home for the family of Adil Shah, who died saving tourists in the Pahalgam attack. The house, costing ₹12 lakh, provides better living conditions for the family.