खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:09 IST2026-04-21T15:08:06+5:302026-04-21T15:09:31+5:30
Summer travel trends 2026: यंदाच्या उन्हाळ्यात भारतीय पर्यटकांनी आशियाई देशांना पहिली पसंती दिली आहे. एअरबीएनबीच्या अहवालानुसार, ओसाका, बुसान आणि टोकियोसाठी सर्वाधिक सर्च झाले असून Gen Z प्रवाशांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे.

खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय पर्यटक आता पाश्चिमात्य देशांऐवजी आशियाई देशांकडे वळत आहेत. एअरबीएनबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय पर्यटकांमध्ये ओसाका, टोकियो आणि बुसान यांसारख्या शहरांबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, कमी प्रवासाचा वेळ आणि सांस्कृतिक जवळीक यामुळे आशियाई देश भारतीयांसाठी 'समर गेटवे' बनले आहेत.
एकूण सर्चमध्ये ४०% हून अधिक वाटा जेनरेशन झेडचा आहे. या पिढीचा कल दरवर्षी ६०% दराने वाढत असून, ते प्रामुख्याने सांस्कृतिक अनुभव, संगीत महोत्सव आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीसाठी प्रवास करत आहेत. दक्षिण कोरियाचे बुसान (९५% पेक्षा जास्त वाढ), जपानमधील टोकियो (९०% पेक्षा जास्त) आणि ओसाका (८५% पेक्षा जास्त) या शहरांसाठी भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले आहेत. तसेच क्वालालंपूर आणि बँकॉक यांसारख्या शहरांनाही सातत्यपूर्ण पसंती मिळत आहे.
कौटुंबिक आणि ग्रुप ट्रॅव्हल
जवळजवळ ६०% सर्च हे ग्रुप किंवा फॅमिली ट्रॅव्हलसाठी असून, ३०% पेक्षा जास्त सर्च दोन व्यक्तींच्या प्रवासासाठी आहेत.
देशांतर्गत पर्यटनातही बदल
भारतातही पर्यटकांनी ठराविक ठिकाणांच्या पलीकडे जाऊन निसर्ग आणि वारसा स्थळांना पसंती दिली आहे. यामध्ये तिरुवनंतपुरम (९०% वाढ), पुरी (३०%), जयपूर (७०%) आणि मेघालय (७०%) या राज्यांमध्ये पर्यटकांचा कल वाढला आहे.