Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:05 IST2026-04-21T16:04:34+5:302026-04-21T16:05:29+5:30

Mumbai Local Train face to face CSMT Video: मुंबईतील CSMT स्थानकात सिग्नल बिघाडामुळे बदलापूर लोकल चुकीच्या प्लॅटफॉर्मवर शिरली. दोन लोकल समोरासमोर आल्याने खळबळ उडाली होती.

Mumbai local face to face CSMT : A major accident was averted! Two local trains collided head-on at CSMT station! Signal failure and motorman's precautions | Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)

Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)

Mumbai Local Train News: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात आज दुपारी ३:१८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे एक थरारक घटना घडली. बदलापूरहून येणारी एक जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म ५ वर आधीच एक लोकल उभी होती.

दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तातडीने ब्रेक लावले, ज्यामुळे होणारी टक्कर थोडक्यात टळली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ पर्यंतची रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. एकाच ट्रॅकवर आलेल्या या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता धीम्या गतीने वाहतूक पूर्ववत केली जात आहे.

प्रवाशांचे हाल
ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सीएसएमटीसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल घेतली असून, नक्की कोणत्या कारणामुळे सिग्नलमध्ये बिघाड झाला, याचा तपास सुरू केला आहे. सध्या बॅकिंगचे काम पूर्ण झाले असून रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

Web Title : बड़ा हादसा टला! सीएसएमटी स्टेशन पर दो लोकल आमने-सामने!

Web Summary : सिग्नल में खराबी के कारण सीएसएमटी स्टेशन पर एक बड़ा हादसा टल गया। एक लोकल ट्रेन को गलत तरीके से उस प्लेटफॉर्म पर भेज दिया गया जहां पहले से ही एक और ट्रेन खड़ी थी। मोटरमैन की तत्परता से टक्कर टल गई। ट्रेन सेवाएं बाधित हुईं, लेकिन अब बहाल हो गई हैं।

Web Title : Major Accident Averted! Two Locals Face-to-Face at CSMT!

Web Summary : A major accident was averted at CSMT station due to a signal malfunction. A local train was wrongly directed onto a platform where another train was already stationed. The motorman's quick thinking prevented a collision. Train services were disrupted but have now resumed.