SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

SRH vs DC यांच्यातील सामन्याआधी मैदानात काय घडलं?

By सुशांत जाधव | Updated: April 21, 2026 19:59 IST2026-04-21T19:58:47+5:302026-04-21T19:59:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs DC Nagpur’s Prafull Hinge Not Playing 11 Ishan Kishan confused After dominating the toss Axar Patel expresses regret; what exactly happened | SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३१ वा सामना हैदबादाच्या राजीव गांधी आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मैदानता उतरताच अक्षर पटेलनं शतक साजरे केले. दिल्ली कॅपिटल्सकडून  शंभरावा सामना खेळताना नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूनं लागला. टॉसचा बॉस ठरल्यावर त्याने मनातील खंत बोलून दाखवली. दुसरीकडे ईशान किशान  संघ बदलासह मैदानात उतरत असल्याचे सांगताना गोंधळलेला दिसला. टॉस वेळी नेमक काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नागपूरकराला खेळवण्यावरून पुन्हा गोंधळला ईशान किशन

नाणेफेकीनंतर ईशान किशन म्हणाला की, सध्याच्या घडीला संघात बदलाचा निर्णय घेणं थोडं कठीण आहे, कारण मागील दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारची खेळपट्टी होती तशी ती दिसत नाही. या सामन्यात मधुशंका संघात आला आहे, प्रफुल हिंगे कदाचित बाहेर राहू शकतो. (अजून पूर्ण खात्री नाही) असे तो म्हणाला. दोघांनाही इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत ठेवण्यात आले आहे. याआधी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ईशान किशन याने नागपूरकर प्रुफल हिंगे याला पदार्पणाची संधी मिळणार असे सांगितले होते. पण त्याला संधीसाठी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात ऐतिहासिक कामगिरी करत त्याने IPL स्पर्धेत मोठा डाव साधला. CSK विरुद्ध महागडा ठरल्यावर अखेरच्या षटकात त्याने १८ धावांचा बचाव करत दमदार कमबॅक केले होते. त्याला खेळवण्याबाबत ईशान किशन गोंधळल्याचे पाहायला मिळाले.

अक्षर पटेलनं व्यक्त केली खंत

दिल्ली कॅपिटल्सकडून शंभरावा सामना खेळण्यासाठी उतरलेल्या अक्षर पटेलनं शतकी सामना विजयासह साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. बहुतांश सामन्यात नाणेफेकीच्या वेळी नशीब साथ देत आहे. पण सर्व सामने जिंकलो असतो तर अधिक चांगले झालं असतं, अशी खंत अक्षर पटेल याने बोलून दाखवली. 

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन 

पथुम निसंका, केएल राहुल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), डेविड मिलर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, लुंगी एनिग्डी

  • दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर : करुण नायर, दुष्मंथा चमीरा, आशुतोष शर्मा, त्रिपुराना विजय, औकिब नबी

 
सनरायझर्स हैदराबाद  प्लेइंग इलेव्हन   

अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, ईशान किशन (कर्णधार), हेन्री क्लासेन, सलील अरोरा (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, हर्ष दुबे, साकिब हुसेन, एशान मलिंगा

  • सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर: स्मरण रविचंद्रन, प्रफुल हिंगे, लियाम लिव्हिंगस्टोन, दिलशान मदुशंका, हर्षल पटेल

 

 

Web Title : SRH vs DC: ईशान किशन भ्रमित, अक्षर पटेल ने निराशा व्यक्त की

Web Summary : SRH बनाम DC में ईशान किशन टीम चयन को लेकर भ्रमित दिखे, अक्षर पटेल ने निराशा व्यक्त की। पटेल ने टॉस जीतने के बावजूद मौके चूकने पर दुख जताया। प्लेइंग XI विवरण शामिल हैं।

Web Title : SRH vs DC: Ishan Kishan Confused, Axar Patel Expresses Disappointment

Web Summary : Ishan Kishan's team selection confusion and Axar Patel's century highlight SRH vs DC. Patel lamented missed opportunities despite favorable tosses. Playing XI details included.