'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:33 IST2026-04-21T19:32:25+5:302026-04-21T19:33:27+5:30

Narendra Modi: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. खर्गे यांच्या या वक्व्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

BJP aggressive against Kharge's statement that calls Bin Laden a Ji and Modi a terrorist | 'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक

'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. खर्गे यांच्या या वक्व्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच भाजपाच्या संबित पात्रा यांच्यापासून ते के. अन्नामलाई यांच्यापर्यंतचे नेते त्यांच्याविरोधात तुटून पडले आहेत. तसेच खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे नेते के अन्नामलाई म्हणाले की, स्वत:चा एक वारसा असलेल्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खूप वाईट भाषेचा वापर केला. ही बाब खूप दुर्दैवी आहे.

तर संबित पात्रा यांनीही खर्गे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. खर्गे यांनी केलेलं विधान हे जिभेचं घसरणं नव्हतं. आता जरी ते स्पष्टीकरण देत असले तरी हा काँग्रेसने जाणीवपूर्वक आखलेला कट आहे. आज राहुल गांधींच्या सांगण्यावरून खर्गे यांनी मोदींना दहशततवादी म्हटले. ही तीच काँग्रेस आहे जिचे नेते ओसामा बिन लादेनला ओसामा जी म्हणते आणि देशाच्या पंतप्रधानांना दहशतवादी म्हणते, अशी टीका पात्रा यांनी केली.

Web Title : मोदी को आतंकवादी कहने पर भाजपा खड़गे के बयान के खिलाफ आक्रामक

Web Summary : मल्लिकार्जुन खड़गे की पीएम मोदी के खिलाफ टिप्पणी से विवाद छिड़ गया। संबित पात्रा और के. अन्नामलाई सहित भाजपा नेताओं ने बयान की कड़ी निंदा करते हुए माफी की मांग की। भाजपा का आरोप है कि कांग्रेस जानबूझकर मोदी को बदनाम करती है, जबकि ओसामा बिन लादेन जैसे आतंकवादियों की प्रशंसा करती है।

Web Title : BJP Aggressively Protests Kharge's Statement Against Modi, Calling Him Terrorist

Web Summary : Mallikarjun Kharge's remarks against PM Modi sparked controversy. BJP leaders, including Sambit Patra and K. Annamalai, strongly condemned the statement, demanding an apology. BJP alleges Congress intentionally defames Modi, while praising terrorists like Osama Bin Laden.