LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:21 IST2026-04-21T19:20:45+5:302026-04-21T19:21:05+5:30

LIC HFL Recruitment 2026: एलआयसी भरती २०२६: ज्युनिअर असिस्टंट पदांच्या १८० जागा, पदवीधरांना मोठी संधी; पहा पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.

LIC HFL Recruitment 2026: Golden job opportunity in LIC! Recruitment announced for Junior Assistant posts; Graduates will get an annual package of up to 5 lakhs | LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज

LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज

मुंबई: बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आनंदाची बातमी दिली आहे. संस्थेने देशभरात 'ज्युनिअर असिस्टंट' पदांच्या १८० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महाराष्ट्रासाठी २५ जागा राखीव असून निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाणार आहे.

भरतीचा सविस्तर तपशील...

पदाचे नाव: ज्युनिअर असिस्टंट

एकूण रिक्त पदे: १८० (महाराष्ट्रात २५ जागा)

वेतन (CTC): शहरांच्या श्रेणीनुसार वार्षिक ४.६४ लाख ते ४.९८ लाख रुपयांपर्यंत पॅकेज (सोबत जेवणाचे कूपन आणि इतर लाभ)

पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे. (डिस्टन्स किंवा पार्ट टाइम पदवीधारक पात्र नाहीत).

वयोमर्यादा: १ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया आणि अर्ज

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ही परीक्षा जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अर्जासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू: १६ एप्रिल २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२६

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.lichousing.com) भेट द्यावी.

Web Title : LIC में जूनियर असिस्टेंट की भर्ती: स्नातकों के लिए सुनहरा अवसर!

Web Summary : एलआईसी हाउसिंग फाइनेंस ने पूरे देश में जूनियर असिस्टेंट के 180 पदों पर भर्ती की घोषणा की है, जिसमें महाराष्ट्र में 25 पद शामिल हैं। 55% अंकों के साथ स्नातक 30 अप्रैल, 2026 तक आवेदन कर सकते हैं। वेतन ₹4.64 लाख से ₹4.98 लाख प्रति वर्ष तक है। चयन ऑनलाइन परीक्षा और साक्षात्कार के माध्यम से होगा।

Web Title : LIC Hiring Junior Assistants: Golden Opportunity for Graduates!

Web Summary : LIC Housing Finance announces 180 Junior Assistant vacancies nationwide, including 25 in Maharashtra. Graduates with 55% marks can apply by April 30, 2026. Salaries range from ₹4.64 to ₹4.98 lakhs annually. Selection via online test and interview.