केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती

By मुरलीधर भवार | Updated: April 21, 2026 19:25 IST2026-04-21T19:24:10+5:302026-04-21T19:25:10+5:30

पक्षाचे नेते गंभीर दखल घेणार का? सोमवारी पार पडलेल्या महासभेत पाणी प्रश्न, एनआरसी कंपनीच्या थकबाकी वसूलाचा मुद्दा, फेरीवाल्यांचा प्रश्न आदी विषय पटलावर चर्चेकरीता होता.

Most of the Shinde Sena's municipal councilors turned away from the KDMC general assembly; Absence during discussions on important issues | केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती

केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती

- मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिकेची महासभा सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार पडली. सभेची वेळ वारंवार तासा तासाने वाढविली गेली. सभेच्या सुरुवातीला सर्व पक्षाचे नगरसेवक पूर्ण संख्येनिशी उपस्थित होते. मात्र त्यानंतर शिंदे सेनेच्या बहुतांश नगरसेवकांनी महासभेला पाठ दाखविली. महासभेत महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना शिंदे सेनेचे नगरसेवक सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणाची शिंदे सेना पक्षाचे नेते गंभीर दखल घेणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोमवारी पार पडलेल्या महासभेत पाणी प्रश्न, एनआरसी कंपनीच्या थकबाकी वसूलाचा मुद्दा, फेरीवाल्यांचा प्रश्न आदी विषय पटलावर चर्चेकरीता होता. एनआरसी कंपनीच्या प्रश्नावर महासभा तहकूब करण्याची मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी स्पष्ट सांगितले की, सभा पूर्ण वेळेकरीता तहकूब केली जाणार नाही. केवळ १५ मिनिटांकरीता सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा पुन्हा सुरु झाली. पाणी प्रश्नावर लक्षवेधी होती. त्यानंतर फेरीवाला प्रश्नावर लक्षवेधी होती. पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा असल्याने काही अंशी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर शिंदे सेनेच्या नगरसेवकांची संख्या रोडावली. फेरीवाला प्रश्नावर चर्चा सुरु झाली तेव्हा आत्ता खूप चर्चा झाली आहे. सभागृहाची वेळ वाढवून द्या अशी मागणी केली गेली. महापौरांनी एक तासाने वेळ वाढविली. त्यानंतर उपमहापौर राहूल दामले यांनीही पुन्हा एक तासाने वेळ वाढविली. मात्र सभागृहात महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना शिंदे सेनेचे नगरसेवक अनुपस्थित होते. एखाद्या वेळी सभागृहात एका विषयावर मतदानाची वेळ आली तर मतदानासाठी नगरसेवक नव्हते. यापूर्वी महापौर आणि उपमहापौर पदासाठी विशेष सभा झाली. त्यानंतर स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समिती सदस्य नियुक्तीकरीता सभा पार पडली. त्यानंतर अर्थ संकल्पाची सभा पारप पडली. खऱ््या अर्थाने सोमवारची सभा ही पहिली महासभा हाेती. जुने नगरसेवक निघून गेले. नवे नगरसेवक ही निघून गेले. त्यांनाही त्यात रस नव्हता.

निवडणूकीसाठी उमेदवारी द्या. अन्यथा बंडखोरी करणार असा दबाव पक्षावर आणला जातो. तर काही जम मूळ पक्षाला सोडून शिंदे सेनेत आले. त्यामुळे शिंदे सेनेतील जुन्यांचे पत्ते कट झाले. आत्ता निवडून येऊन नगरसेवक झाल्यावर जनतेच्या प्रश्नावरील नगरसेवकांची ही अनास्था पक्षाला परवडणारी नाही. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल पक्षाचे नेते घेणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे सेनेपाठोपाठ भाजपचे काही नगरसेवकांनीही सभेला पाठ दाखविली होती.

Web Title: Most of the Shinde Sena's municipal councilors turned away from the KDMC general assembly; Absence during discussions on important issues