अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

अभिषेक शर्माचा विक्रमी डाव! ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंचला धोबीपछाड

By सुशांत जाधव | Updated: April 21, 2026 22:06 IST2026-04-21T21:56:10+5:302026-04-21T22:06:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs DC Abhishek Sharma Creates History Becomes 1st Cricketer In World To Do This Breaks Chris Gayle Aaron Finch Record | अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

 Abhishek Sharma Creates History Becomes 1st Cricketer  In World Do This : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामातील पहिले आणि आयपीएलमधील दुसरे शतक साजरे केले. दिल्लीकरांची धुलाई करताना अभिषेक शर्मानं १० चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने नाबाद १३५ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात २४२ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २४३ धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अभिषेक शर्माचा विक्रमी डाव! ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंचला धोबीपछाड

अभिषेक शर्मानं नाबाद १३५ धावांच्या खेळीसह ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंच या दिग्गजांना धोबीपछाड देत टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. कॅरेबियन स्टार ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲरॉन फिंच यांनी आपल्या टी-२० कारकिर्दीत तीन वेळा १३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड होता. अभिषेक शर्मानं चौथ्यांदा ही कामगिरी करून दाखवत नवा इतिहास रचला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये चार वेळा १३० पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरलाय. 

SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

टी-२० क्रिकेट जगतात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

सनरायझर्सचा हुकमी एक्का असलेल्या अभिषेक शर्मानं गत हंगामात पंजाब किंग्स विरुद्ध IPL मधील पहिले शतक झळकाले होते. या सामन्यात त्याने १४१ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने १३५ धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने पंजाबकडून खेळताना बंगालविरुद्ध ५२ चेंडूत १४८ धावांची खेळी केली होती. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने १३५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 

Web Title : अभिषेक शर्मा: टी20 में यह उपलब्धि हासिल करने वाले दुनिया के पहले खिलाड़ी!

Web Summary : दिल्ली कैपिटल्स के खिलाफ अभिषेक शर्मा की नाबाद 135 रनों की पारी ने टी20 में एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया। उन्होंने गेल और फिंच को पछाड़कर 130+ का स्कोर चार बार बनाने वाले पहले खिलाड़ी बन गए। यह उनकी पिछली आईपीएल और सैयद मुश्ताक अली ट्रॉफी की उपलब्धियों के अतिरिक्त है।

Web Title : Abhishek Sharma: First in the world to achieve this T20 feat!

Web Summary : Abhishek Sharma's unbeaten 135 against Delhi Capitals marks a historic T20 record. He surpassed Gayle and Finch, becoming the first to score 130+ four times. This adds to his prior IPL and Syed Mushtaq Ali Trophy achievements.