२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास

KL राहुलनं  दमदार सुरुवात केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 23:25 IST2026-04-21T23:18:55+5:302026-04-21T23:25:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs DC Sakib Hussain Gets Wicket KL Rahul 37 Runs Brilliant catch by Abhishek Sharma | २०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास

२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास

हैदराबादच्या घरच्या मैदानात अभिषेक शर्माच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संगाने दिलेल्या २४३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पथुम निसंका अवघ्या ८ धावा करून परतल्यावर केएल राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली. त्याने चांगली सुरुवात करत २०० पारच्या लढाईतील खराब रेकॉर्ड सुधारण्याच्या इराद्याने फलंदाजी केली. पण सेट झाल्यावर अभिषेक शर्मानं सर्वोत्तम झेल टिपत त्याच्या खेळीला ब्रेक लावला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

KL राहुलनं  दमदार सुरुवात केली, पण...

 नितीश राणाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी त्याने ८६ धावांची भागीदारीही रचली. पण साकिब हुसेन याने १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर केएल राहुलच्या खेळीला ब्रेक लावला. फलंदाजीत धमाका करणाऱ्या अभिषेक शर्मानं क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा पेश करत केएल राहुलचा अप्रतिम झेल टिपला. यासह २०० पारच्या लढाईत केएल राहुल पुन्हा एक सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. 

अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

२०० पारच्या लढाईत खराब कामगिरी कायम

केएल राहुल याने क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीतील स्टाइल स्टेटमेंटसह खास छाप सोडली आहे. IPL मध्ये तो धमक दाखवून देताना दिसत आहे. पण २०० पारच्या लढाईत त्याची आकडेवारी खूपच खराब आहे. IPL मध्ये आतापर्यंत KL राहुलनंं २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना २० डावात ४ अर्धशतकाच्या मदतीने ३१.१० च्या सरासरीसह १४३.३२ च्या स्ट्राईक रेटनं ६२२ धावा केल्या आहेत. या खराब कामगिरीचा संघाला फटका बसला असून मागील १९ सामन्यात त्याच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. 

Web Title : 200+ के लक्ष्य में KL राहुल फिर विफल; अभिषेक शर्मा चमके!

Web Summary : 243 रनों का पीछा करते हुए दिल्ली कैपिटल्स की शुरुआत खराब रही। केएल राहुल ने अच्छी शुरुआत की, लेकिन अभिषेक शर्मा ने शानदार कैच लपका। 200+ के लक्ष्य में उनका खराब रिकॉर्ड जारी है, जिसका टीम के प्रदर्शन पर असर पड़ा।

Web Title : KL Rahul fails again in 200+ chase; Abhishek Sharma shines!

Web Summary : Chasing 243, Delhi Capitals struggled. KL Rahul started well but fell to a brilliant catch by Abhishek Sharma. His poor record in 200+ chases continues, impacting the team's performance with past defeats.