SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल

सनरायझर्स हैदराबादचा दिमाखदार विजय, गुणतालिकेत टॉप ३ मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 23:56 IST2026-04-21T23:43:30+5:302026-04-21T23:56:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sunrisers Hyderabad Won Ny 47 Runs vs Delhi Capitals Eshan Malinga Harsh Dubey Shine With Bowl After Abhishek Sharma Record Breaking Century | SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल

SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल

IPL 2026, Sunrisers Hyderabad Won Ny 47 Runs vs Delhi Capitals अभिषेक शर्माच्या विक्रमी शतकी खेळीनंतर एशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत केले. ऑरेंज आर्मीनं सेट केलेल्या २४३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून नितीश राणाच्या अर्धशतकाशिवाय समीर रिझवी वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  परिणामी अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १९५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यंदाच्या हंगामातील सातव्या सामन्यातील चौथ्या  विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचला असून दिल्ली कॅपिटल्स संघ सहा सामन्यातील चार विजयासह ८ गुण खात्यात जमा करत पाचव्या स्थानावर आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अभिषेक शर्मानं केली दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई, फक्त अक्षरला मिळाली एकमेव विकेट

पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादच्या मैदानात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंगावलं. या पठ्ठ्यानं दिल्लीकरांची धुलाई करताना १० चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने ६८ चेंडूत १३५ धावांची खेळी केल्या. ट्रॅविस हेटनं २६ चेंडूत ३७ धावा केल्या. अक्षर पटेल याने त्याची विकेट घेतली. हैदराबादचा कर्णधार ईशान किशन १३ चेंडूत २५ धावा करून धावबाद झाल्यावर हेन्री क्लासेन याने १३ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने नाबाद ३७ धावांचे योदान देत संघाच्या धावफलकावर २ बाद २४२ धावा लावल्या होत्या.

अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं अवघ्या २१ धावांवर पहिली विकेट गमावली. पथुमन निसंका ८ धावा करून माघारी फिरला. मदुशंकाने त्याची विकेट घेतली. केएल राहुल आणि नितीश राणा जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण साकीब हुसेन याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मानं केएल राहुलचा अप्रतिम झेल टिपत संघाला महत्त्वपू्ण विकेट मिळवून दिली. लोकेश राहुल ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर नितीश राणाने ३० चेंडूत ५७ धावांची खेळी केली. समीर रिझवीने २८ चेंडूत केलेल्या ४१ धावा आणि लोअर मिडल ऑर्डरमध्ये ट्रिस्टन स्टब्सने २७ (१६) आणि आशुतोष शर्मा १४ (१०) याशिवाय कोणत्याही फंलदाजाला द्विशतकी आकडा गाठता आला नाही. परिणामी दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित २० षटकात १९५ धावांवरच अडखळला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडू गोलंदाजीत एशान मलिंगा याने सर्वाधिक ४ तर हर्ष दुबेनं ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. मदुशंका आणि साकिब हुसेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

Web Title : SRH ने DC को हराया, अभिषेक शर्मा का शानदार प्रदर्शन!

Web Summary : अभिषेक शर्मा के शतक और मलिंगा-हर्ष दुबे की शानदार गेंदबाजी से सनराइजर्स हैदराबाद ने दिल्ली कैपिटल्स को 47 रनों से हराया। नीतीश राणा के अर्धशतक के बावजूद, डीसी 243 रनों का लक्ष्य हासिल करने में विफल रही, 195/9 पर समाप्त हुई। एसआरएच अब तालिका में तीसरे स्थान पर है।

Web Title : Abhishek Sharma shines as SRH defeats DC convincingly at home.

Web Summary : Abhishek Sharma's century and impressive bowling by Malinga and Harsh Dubey led Sunrisers Hyderabad to a 47-run victory over Delhi Capitals. Despite Nitish Rana's fifty, DC struggled to chase the 243-run target, finishing at 195/9. SRH now ranks third in the points table.