Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 18:00 IST2026-04-21T09:48:46+5:302026-04-21T18:00:54+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
21 Apr, 26 : 05:29 PM
आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
21 Apr, 26 : 05:18 PM
बारामती माझी ताकद - सुनेत्रा पवार
बारामती माझी ताकद आहे. बारामतीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानते - सुनेत्रा पवार
21 Apr, 26 : 05:10 PM
दादा गेले पण त्यांची स्वप्नं अजून जिवंत - सुनेत्रा पवार
दादा गेले पण त्यांची स्वप्नं अजून जिवंत आहेत. जनसेवेसाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या तशीच मी लढणार - सुनेत्रा पवार
21 Apr, 26 : 03:22 PM
चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला आयपीएल २०२६च्या हंगामात एक मोठा धक्का बसला आहे. मराठमोळा युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सीएसकेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाचा सविस्तर
21 Apr, 26 : 03:12 PM
भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन
ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून या प्रकरणात महेश आहेर संबंधित महिलेला भोंदू अशोक खरात याच्या कार्यालयातही घेऊन गेला होता असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे खरात आणि ठाणे कनेक्शन उघड होत आहे.
21 Apr, 26 : 03:10 PM
रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला
कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाद्याची वाडी येथील कृष्णा भागा आगीवले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून मंगळवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान कळभोडा येथील कृष्णा आगीवले हा जंगलातील रानमेवा गोळा करण्यासाठी गेला होता. झाडावरील आंबे, करवंदं गोळा करत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर झडप घातली.
21 Apr, 26 : 01:43 PM
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोच्चीला पोहोचलेल्या पोलिसांच्या पाच सदस्यीय पथकाला रिकाम्या हाताने परतावं लागलं. कारण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मोनालिसा प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर
21 Apr, 26 : 12:53 PM
ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त
राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रशासनावर मोठा परिणाम झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयांमधील कामकाज अक्षरशः ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
21 Apr, 26 : 12:41 PM
खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच
भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर
21 Apr, 26 : 12:35 PM
भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
"केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने ठरवले की महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेररचना, गुजरातमध्ये २००१ च्या जनगणनेनुसार करणार. काही निर्णय घेऊ शकतात. २०११ मध्ये मतदारसंघ फेररचना झाली. त्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी होते, त्यातील अनेक अधिकाऱ्यांना भाजपाने नोकरीवर घेतले आहे. त्यांनी वेगळे काम त्यांच्या कार्यालयात सुरू केलं आहे. म्हणजे मला पाडायचं असेल, तर मतदारसंघातील कोणता भाग तोडायचा", असे रोहित पवार म्हणाले.
21 Apr, 26 : 11:48 AM
ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या विमानाला मुद्दाम उशीर केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, भाजपा सरकारने त्यांच्या विमानाला उशीर करण्यासाठी विमानतळावर आपल्या 'निवडक' अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या की, माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटांपर्यंत थांबवून ठेवण्यात आलं. हेमंत सोरेन यांच्या चॉपरसोबतही अगदी असंच घडलं होतं. वाचा सविस्तर
21 Apr, 26 : 10:07 AM
"ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र डागले. ट्रम्प प्रशासन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट प्रशासन असल्याचे त्या म्हणाल्या.
"आपण अशा राष्ट्राध्यक्षाच्या प्रशासनाचा सामना करत आहोत, जो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट, निर्दयी आणि लायक नाहीये", असे कमला हॅरिस म्हणाल्या.
21 Apr, 26 : 10:01 AM
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण, पुण्यातील पीडित कुटुंबाच्या भावना...
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेला वर्ष पूर्ण, हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केल्या भावना
#WATCH | Pune, Maharashtra | Wife of deceased Pahalgam terror attack victim Santosh Jagdale, Pragati Jagdale says, "A year has passed, but I am still stuck on 22 April 2026 Pahalgam attack… I did not know that he was no more; I thought maybe he had passed out, but he will… pic.twitter.com/NXdwwhBZ5a
— ANI (@ANI) April 21, 2026
21 Apr, 26 : 09:56 AM
सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिका बेमुदत संपावर; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा, रुग्णसेवेवर होतोय परिणाम pic.twitter.com/hif5sMBao2
— Lokmat (@lokmat) April 21, 2026
21 Apr, 26 : 09:51 AM
मध्य रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल
डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी झालेल्या लोकल डबा घसरण्याचा अपघातामुळे सलग दुसऱ्या दिवशीही त्याचे परिणाम जाणवले. मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.