Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:20 IST2026-04-21T11:18:38+5:302026-04-21T11:20:48+5:30

Vastu Shastra: कामात अडथळे, सततचं आजारपण आणि विनाकारण चिडचिड? हे नकारात्मक ऊर्जा दर्शवतात, ती दूर करण्याचे उपाय जाणून घ्या. 

Vastu Tips: Frequent obstacles and financial woes? These simple solutions from Vastu Shastra will be a panacea! | Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!

Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!

अनेकदा सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक कामात अडथळे येणे, घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे किंवा विनाकारण चिडचिड होणे अशा समस्या जाणवतात. वास्तुशास्त्रानुसार, याला 'नकारात्मक ऊर्जा' किंवा 'दृष्ट लागणे' असे म्हटले जाते. यावर मात करण्यासाठी काही सोपे आणि शास्त्रीय उपाय फायदेशीर ठरतात.

हे ही वाचा : Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....

१. मिठाचा प्रभावी वापर (Salt Remedies)

मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

फरशी पुसताना: दररोज घर पुसताना पाण्यात थोडे 'खडे मीठ' (Sea Salt) टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक लहरी नष्ट होतात.

काचेची वाटी: घराच्या कोपऱ्यात किंवा बाथरुममध्ये काचेच्या वाटीत थोडे मीठ भरून ठेवावे. दर १५ दिवसांनी हे मीठ बदलून टाकावे.

२. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करा 'हे' बदल

वाईट नजर सर्वात आधी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते, म्हणून तिथे संरक्षण असणे आवश्यक आहे.

लिंबू-मिरची: शनिवारी घराच्या प्रवेशद्वारावर सात मिरच्या आणि एक लिंबू बांधावे. यामुळे बाहेरील नकारात्मकता घरात येत नाही.

हनुमानाचा फोटो: प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने घराचे रक्षण होते.

आरसा (Mirror): घराच्या बाहेरच्या बाजूला एक छोटा आरसा अशा प्रकारे लावा की, येणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब त्यात पडेल. यामुळे वाईट दृष्टी परत फिरते.

हे ही वाचा : Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

३. व्यवसाय आणि दुकानासाठी उपाय

जर व्यवसायाला नजर लागली असेल, तर खालील गोष्टी कराव्यात:

तुरटी (Alum): दुकानाच्या किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वारावर काळ्या कापडात तुरटी बांधून टाकावी.

मोरपंख: आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कॅश बॉक्समध्ये मोरपंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक भरभराट होते.

कापूर जाळणे: रोज संध्याकाळी दुकानात भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर सर्वत्र फिरवावा.

Web Title: Vastu Tips: Frequent obstacles and financial woes? These simple solutions from Vastu Shastra will be a panacea!