अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:39 IST2026-04-21T12:39:07+5:302026-04-21T12:39:43+5:30

एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १० वर्षांच्या मुलीच्या मेंदूने काम करणं जवळजवळ बंद केलं. मुलीला साध्या-साध्या गोष्टीही आठवेनाशा झाल्या आणि स्वतःहून चालणं, फिरणंही कठीण झालं.

momos cause liver failure in delhi girl plasmapheresis saves life | अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना

AI फोटो

दिल्लीतील बुरारी येथील एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १० वर्षांच्या मुलीच्या मेंदूने काम करणं जवळजवळ बंद केलं. मुलीला साध्या-साध्या गोष्टीही आठवेनाशा झाल्या आणि स्वतःहून चालणं, फिरणंही कठीण झालं. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. तपासणीअंती समोर आलं की, तिचं लिव्हर फेल झालं आहे. शरीरातील विषारी पदार्थांच्या संसर्गामुळे मेंदूला सूज आली होती. तिला तातडीने आयसीयूमध्ये (ICU) दाखल करावं लागलं. तिच्या या अवस्थेला मोमोजसारखे फास्ट फूड कारणीभूत ठरले.

मुलीचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. दिवसभर कामामुळे ते घरी नसताना ही मुलगी आजोबांकडून पैसे घेऊन बाहेरून मोमोज आणि इतर पदार्थ आणून आवडीने खायची. प्लाज्माफेरेसिस प्रक्रियेमुळे जीव वाचल्यानंतर आता मुलीने मोमोजला कायमचं बाय-बाय म्हटलं आहे. मुलीची आई सावित्री माथूर यांनी सांगितलं की, त्यांचे पती किशोर मोबाईलशी संबंधित काम करतात, तर त्या स्वतः मुखर्जी नगरमध्ये केअरटेकर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आहेत - तान्या (१० वर्षे) आणि गौरी (८ वर्षे).

आजोबांकडून पैसे घेऊन खायची मोमोज

पालक घरी बनवलेलं जेवणच मुलांना देतात, परंतु शाळा सुटल्यानंतर तान्या आजोबांकडून पैसे घेऊन कधी मोमोज तर कधी चिप्स आणून खायची. सुरुवातीला ती गोष्टी विसरू लागली आणि तिला थकवा जाणवू लागला. नंतर तिला साधं उभं राहणंही कठीण झालं. जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिला कावीळ झाल्याचं समजलं. तिची अवस्था इतकी गंभीर होती की 'आम्ही तिला गमावतो की काय' अशी भीती वाटत होती. अखेर तिला मॉडेल टाऊनमधील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी दिला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला

सुरुवातीला डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला होता, परंतु प्लाज्माफेरेसिस उपचारामुळे मुलगी बरी झाली. बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश शर्मा यांच्या मते, दिल्लीतील सुमारे ३५ टक्के मुलांमध्ये 'फॅटी लिवर'ची लक्षणं दिसून येत आहेत. फास्ट फूड, स्क्रीन टाइम (मोबाईल-टीव्हीचा वापर) आणि व्यायामाचा अभाव ही याची मुख्य कारणं आहेत. आता कमी वयातही लिव्हर फेल होण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत, जसं या प्रकरणात घडलं.

Web Title : मोमोज बने जानलेवा: 10 वर्षीय बच्ची का लिवर फेल, याददाश्त कमजोर।

Web Summary : दिल्ली में मोमोज खाने से 10 वर्षीय बच्ची का लिवर खराब, याददाश्त कमजोर। फास्ट फूड और व्यायाम की कमी से बच्चों में लिवर की समस्या बढ़ रही है। डॉक्टरों ने बच्चों में फैटी लिवर को लेकर चेतावनी दी है।

Web Title : Momos turn deadly: 10-year-old suffers liver failure, memory loss.

Web Summary : Delhi girl's momo addiction led to liver failure and memory loss. Fast food, lack of exercise blamed for rising liver issues in kids. Doctors warn about fatty liver in children due to lifestyle.

टॅग्स :delhiदिल्ली