Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:40 IST2026-04-20T14:40:07+5:302026-04-20T14:40:48+5:30

Sade Sati: मेष, कुंभ, मीन राशीची साडेसाती, धनु, सिंह राशीला शनीचा ढैय्या; या काळात कोणत्या अडचणी येतात आणि कोणते बदल होतात ते जाणून घेऊ. 

Sade Sati: Is Sade Sati a curse or an opportunity for change? What will the coming period be like for Aries, Aquarius and Pisces? | Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाचा प्रभाव मानवी जीवनावर खोलवर पडत असतो. सध्या शनी देव मीन राशीत विराजमान असून ते ३ जून २०२७ पर्यंत याच राशीत राहतील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील. या संक्रमणामुळे सध्या मेष, कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती सुरू आहे, तर सिंह आणि धनू राशींना छोटी ढैय्या सोसावी लागत आहे. त्यामुळे येणारा काळ तीन राशींसाठी कसा असेल ते ज्योतिष अभ्यासक दीप्ती जोशी यांच्या माहितीतून जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

१. मेष रास (Mesh): संघर्षातून कठीण प्रवास

साडेसातीचा पहिला टप्पा: २९ मार्च २०२५ पासून

मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीची ही केवळ सुरुवात आहे. हा काळ तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा ठरेल.

मानसिक स्थिती: खर्च वाढणे, निद्रानाश आणि मानसिक ताण जाणवेल. एकटेपणा जाणवेल. 

करिअर आणि आर्थिक: नोकरी बदलताना हातात लेखी कागदपत्र (Written Document) असल्याशिवाय जुना राजीनामा देऊ नका. गुंतवणुकीत मोठी जोखीम घेऊ नका; फसवणुकीची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचारापासून लांब राहावे, अन्यथा न्यायालयीन कटकटी मागे लागू शकतात.

वैयक्तिक आयुष्य: नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. मात्र, मे महिन्यानंतर ऑनलाइन माध्यमातून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत आहेत.

महत्त्वाची टीप: मे ते जून दरम्यान अपघाताचे योग आहेत, त्यामुळे प्रवासात विशेष काळजी घ्यावी. जुलै २०२६ पर्यंत त्रास जास्त जाणवेल, त्यानंतर ऑगस्ट २०२६ पासून मनावरचा ताण कमी होईल. 

हे ही वाचा : Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

२. कुंभ रास (Kumbh): सातत्य आणि शिस्तीतून प्रगती

साडेसातीचा अंतिम टप्पा: मार्च २०२५ ते ३ जून २०२७

कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी अशी की, तुमचा कठीण काळ आता संपत आला आहे. गेल्या काही वर्षांतील जबाबदाऱ्यांचा डोंगर आता हलका होईल.

आर्थिक स्थिती: पैशांची आवक हळूहळू सुधारेल. जुन्या अडकलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळेल. नवीन घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

नातेसंबंध: बिघडलेले संबंध सुरळीत होतील. जुनी ओळख असलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. मात्र, ऑगस्ट २०२६ पर्यंत अहंभाव (Ego) बाजूला ठेवून वागणे हिताचे ठरेल.

प्रगती: प्रलंबित कामे मार्गी लागतील. ऑगस्ट २०२६ नंतर परिस्थिती कमालीची सुधारेल आणि २०२७ मध्ये साडेसाती संपल्यावर मोठे सकारात्मक बदल दिसतील.

३. मीन रास (Meen): नैराश्यातून उमेदीकडे

साडेसातीचा दुसरा (शिखर) टप्पा: २९ मार्च २०२५ ते ३ जून २०२७

मीन राशीसाठी हा साडेसातीचा सर्वात कठीण मानला जाणारा काळ आहे. हा टप्पा तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी आला आहे.

भावनिक स्थिती: विश्वासघात, नातेसंबंधातील दुरावा (Break-up) किंवा मानसिक एकाकीपण यामुळे मन खिन्न राहू शकते. पण लक्षात ठेवा, या काळात जे लोक दूर जात आहेत, ते तुमच्या हिताचेच आहे.

करिअर: आर्थिक निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. व्यवसायात मोठी गुंतवणूक सध्या टाळावी. ऑक्टोबर २०२६ नंतर करिअरमध्ये सकारात्मक वळण मिळेल.

आरोग्य: रात्रीचा किंवा पाण्याजवळचा प्रवास शक्यतो टाळावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

हे ही वाचा : इकिगाई (Ikigai): जगण्याला उद्देश देणारा जपानी मंत्र आणि सकाळच्या ५ प्रभावी सवयी, ज्या बदलतील तुमचे आयुष्य!

ढैय्या विशेष: सिंह आणि धनू रास

सध्या सिंह आणि धनू राशीच्या व्यक्तींना शनिची छोटी ढैय्या सुरू आहे. यामुळे त्यांना कामात अडथळे, मानसिक अस्वस्थता किंवा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. कष्टाशिवाय पर्याय नाही, हे तत्त्व पाळल्यास यश नक्की मिळेल.

शनी ग्रहाच्या पिडेवर प्रभावी उपाय

शनी देवाचा कोप कमी करण्यासाठी आणि मनाला शांतता लाभण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात:

रासविशेष मंत्र / उपासनादान आणि सेवा
मेष"ॐ शं शनैश्चराय नमः" आणि हनुमान चालीसाशनिवारी काळे तीळ किंवा तेल दान करणे.
कुंभ"ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः"कावळ्यांना किंवा गरजूंना अन्न देणे, मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे.
मीनमहामृत्युंजय मंत्र किंवा "ॐ गुरवे नमः"वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडणे, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मदत करणे.

साडेसाती हा काळ केवळ शिक्षेचा नसून तो आत्मपरीक्षणाचा आहे. कमी बोलणे, संयम राखणे आणि शिस्तबद्ध जीवन जगणे हे या काळातील सर्वात मोठे उपाय आहेत. २०२७ मध्ये जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल!

Web Title : साढ़े साती: परीक्षा या परिवर्तन? मेष, कुंभ, मीन के लिए भविष्यवाणियाँ।

Web Summary : शनि का गोचर मेष, कुंभ और मीन राशि को साढ़े साती से प्रभावित करता है। ज्योतिषी दीप्ति जोशी द्वारा चुनौतियों और अवसरों की भविष्यवाणी की गई है। राहत के लिए उपाय सुझाए गए हैं।

Web Title : Sade Sati: Trials or Transformation? Predictions for Aries, Aquarius, Pisces.

Web Summary : Shani's transit impacts Aries, Aquarius, and Pisces with Sade Sati. Challenges and opportunities are predicted by astrologer Deepti Joshi. Remedies are suggested for relief.