Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:29 IST2026-04-20T10:25:11+5:302026-04-20T10:29:15+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार १९ ते २५ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. यात पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार दिलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान वाटणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल! या आठवड्यात खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.

हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काम पूर्णत्वास जाऊ शकते. अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अडथळे दूर होतील, त्यांना पार करण्याची शक्ती तुमच्याकडे असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आवाज लोकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. परिस्थितीशी दोन हात करा. आत्मविश्वास ठेवा फक्त त्याचा अतिरेक नको! पुढे होऊन नेतृत्व करा. बदल घडण्याची वाट बघू नका, तो स्वतः घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा!

हा सप्ताह तुमच्यासाठी निवांत वेळ घेऊन येत आहे. तुमच्या आवडीचं काहीतरी करु शकाल. एखादा आनंदाचा कार्यक्रम होईल. मागे केलेल्या कष्टाचे फळ काही प्रमाणात मिळेल. लहानसा उत्सव साजरा कराल. समारंभामध्ये सहभागी व्हाल किंवा तुम्ही स्वतः तुमच्या आवडीच्या लोकांशी भेटी होतील. एकमेकांना सहाय्य कराल. या आठवडयात तुम्ही मन मोकळे हसा आणि मन मोकळे बोला. तुमच्या जवळच्या माणसांशी आवर्जून संवाद साधा. स्वार्थबुद्धी सोडा.

हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या आठवड्यात तुम्ही नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.

हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात पण एकुणात परिस्थीत चांगली राहील. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल. एखादा प्रवास घडेल. या आठवड्यात तुम्ही अतिशय प्रामाणिकपणा जपण्याची गरज आहे. संवाद कौशल्यात सुधारणा करा. वाचन, लेखन यासारख्या गोष्टींत मन रमवा. फक्त लहान तोंडी मोठा घास घेऊ नका!

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचं चिंतन आणि मनन करण्याचा आहे. हव्या तशा गतीने गोष्टी पुढे सरकणार नाहीत. एखाद्या गूढ आणि संभ्रम निर्माण करण्याऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकता. पण हे तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे. नेहमी वेग हाच पुढे वाढण्याचा प्रमाण नसतो, हे लक्षात ठेवा! या आठवड्यात तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रसंगी इतरांकडे धाव घेण्यापेक्षा स्वतः अंतर्मुख होऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. विवेक आणि संयम ठेवा.

हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्णत्वाचा असणार आहे. कुठलेतरी काम एका टप्प्यापर्यंत पूर्ण होईल. काहीतरी मिळवल्याचे समाधान वाटेल. एखाद्या त्रासातून, किंवा बंधनातून मुक्त व्हाल. प्रवासयोग संभवतात. या आठवड्यात तुम्हाला जे मिळेल ते मोठ्या मनाने स्वीकारण्याची गरज आहे. संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार ठेवा. सगळ्यांना सामावून घ्या. आनंदी मनाने एखाद्या गरजवंताला दान करा. सामाजिक कार्य करा. "जीना इसी का नाम है!" या गाण्याचे बोल आठवा आणि त्याप्रमाणे वागा!

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. तुमच्यातील जिद्द, धाडस, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती, या सगळ्यांचा उपयोग करुन तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक घटना घडतील. इतरांकडून मान सन्मान आणि सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्ही काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. चांगले नेतृत्व करा.

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन चैतन्य घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. ताजे टवटवीत वाटेल! या आठवड्यात तुम्ही इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा. एखाद्या कलेत वेळ घालवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर संधीचे सोने होईल!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता. ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com