Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:02 IST2026-04-20T11:02:48+5:302026-04-20T11:02:48+5:30

Mamata Banerjee And BJP : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

west bengal elections Mamata Banerjee threatens officials tmc workers video viral social media | Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी

Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी

पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. नेते मंडळी विजयासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागे-पुढे पाहत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना इशारा देताना म्हटलं की, "उद्या भाजपा सत्तेत नसेल... हे लक्षात ठेवा. मला तुमचं नाव, काम आणि ठिकाण सर्व काही माहित आहे. निवडणुकीत तुम्ही नीट काम केलं नाही, तर मला प्रत्येकाची हिस्ट्री माहित आहे, त्यानुसार हिशोब चुकता केला जाईल." दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी (TMC) समर्थकांनीही जनतेला धमकावण्यास सुरुवात केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना टार्गेट केलं आहे. जुलै २०२५ मध्ये एसआयआर (SIR) संदर्भात बोलताना ममता म्हणाल्या होत्या की, "ते राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, निवडणूक आयोगाचे (ECI) नाहीत. त्यांनी राज्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे."

केवळ ममता बॅनर्जीच नव्हे, तर टीएमसीचे नेते आणि समर्थकही बंगालमध्ये मतदारांना धमकावताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक टीएमसी समर्थक जनतेला सांगत आहे की, "तुम्ही कोणाला मतदान केलं आहे, ते आम्ही पाहून घेऊ..."

निवडणुकीपूर्वीच्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, "मला तुमची सगळी हिस्ट्री माहिती आहे. उद्या भाजपा नसेल... तुमचं नाव आणि ठिकाण माझ्या लक्षात आहे. निवडणुकीत जर तुम्ही योग्य रीतीने काम केले नाही, तर प्रत्येकाचा हिशोब होणारच." राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान एकीकडे ममता बॅनर्जी अधिकाऱ्यांना धमकावत असताना, त्यांचे कार्यकर्तेही मागे राहिलेले नाहीत.

Web Title : ममता बनर्जी ने अधिकारियों को धमकी दी: 'मुझे सब पता है, हिसाब होगा!'

Web Summary : पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने चुनाव में ठीक से काम न करने पर अधिकारियों को जवाबदेह ठहराने की चेतावनी दी। उन्होंने कहा कि उन्हें उनके नाम, काम और ठिकाने पता हैं, और हिसाब बराबर करने का वादा किया। टीएमसी समर्थकों पर मतदाताओं को धमकाने का भी आरोप है। बनर्जी पहले भी अधिकारियों को निशाना बना चुकी हैं।

Web Title : Mamata Banerjee Threatens Officials: 'I Know Everything, Accounts Will Be Settled!'

Web Summary : West Bengal's CM Mamata Banerjee warned officials of accountability if they don't work properly in elections. She stated she knows their names, work, and locations, promising to settle accounts. TMC supporters are also allegedly threatening voters. Banerjee has previously targeted officials, demanding loyalty to the state.