Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:24 IST2026-04-20T12:24:08+5:302026-04-20T12:24:08+5:30

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

"...then the Snake will bite your child"; the fear shown to the woman by the fraudster Ashok Kharat | Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

लैंगिक शोषण आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी खरातच्या खांद्याची सर्जरी झाली असून, त्याचं डोकंही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी त्याला फारसा फरक पडत नसल्याने आता वैद्यकीय तपासणीसाठी मेंदूविकार तज्ज्ञांकडे घेऊन जावे लागल्यास नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती खरातच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी खरातवर आवश्यक ते औषधोपचार करण्यासाठी सूचना पोलिसांना केली.

 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

दरम्यान, एसआयटीने या पाचव्या गुन्ह्यात खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. महिलेवर अत्याचार व जादूटोणाची भीती दाखविणे हा पाचवा गुन्हा खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. पाचवा गुन्हादेखील गंभीर स्वरूपाचा असल्याचे सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर, अॅड. शैलेंद्र बागडे यांनी सांगितले. न्या. पटेल यांच्याकडे सुनावणी झाली.

औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती

मुलाला नाग दंश करण्याची घातली होती भीती

भोंदू अशोक खरातबाबत रविवारच्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी केलेला धक्कादायक खुलासा महत्त्वपूर्ण ठरला. खरातने पीडित महिलेला पेढा खाऊ घातला होता. नंतर गुंगी निर्माण करणारे पाणी देऊन तिच्यावर अत्याचार केले. मी सांगेन तसेच कर, माझ्यात दैवी चमत्कार असून त्याने तुलाच फायदा होईल, असे सांगून अत्याचाराबाबत कुणास काही सांगितलं तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल, असे सांगून पीडितेच्या मनात भीती घातली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला

 "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार

दोन मोबाइलमधील डिलीट डेटा पुन्हा रिकव्हर

भोंदू अशोक खरातचे जे चार मोबाइल एसआयटीने जप्त केले होते त्यापैकी दोन मोबाइलमधील डेटा रिकव्हर करण्यात फॉरेन्सिक टीमला यश आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातकडून झालेले व्हॉटसअॅप मेसेज यामध्ये बरेच काही दडले असून कोडवर्डने मोबाईलमध्ये सेव्ह केलेल्या विविध नंबरवरून आलेले मेसेज बारकाईने तपासले जात आहेत. खरातवर गुन्हा दाखल झाल्याबरोबर त्याने व कुटुंबीयाने तातडीने मोबाइलमधील काही संशयास्पद बाबी डिलीट केल्या होत्या. पहिल्या दिवशी एक, तर नंतर एक एक करून खरातचे अन्य तीन मोबाइल जप्त करण्यात आले होते.
 

Web Title : ढोंगी बाबा की धमकी: नाग देवता तुम्हारे बच्चे को डस लेगा।

Web Summary : अशोक खरात को यौन शोषण और धोखाधड़ी के पांचवें मामले में पुलिस हिरासत मिली। उसने पीड़िता को धमकी दी कि अगर उसने दुर्व्यवहार के बारे में बताया तो उसके बच्चे को नाग देवता डस लेंगे। पुलिस ने खरात के फोन से डिलीट किया डेटा बरामद किया।

Web Title : Fake godman threatened woman: Snake god will bite your child.

Web Summary : Ashok Kharat received police custody in a fifth case involving sexual abuse and fraud. He threatened a victim, saying her child would be bitten by a snake god if she spoke about the abuse. Police recovered deleted data from Kharat's phones.