प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:48 IST2026-04-20T13:45:45+5:302026-04-20T13:48:46+5:30

दरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर अनेक प्रवासी रडत-रडत देवाकडे प्रार्थनाही करू लागले होते.

Prayers and tears 4 hours of facing death in the air Technical failure in Fly91 flying from Hyderabad to Hubli, fortunately a major disaster was averted | प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!


हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या 'फ्लाई९१' (Fly91) एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा आपघात थोडक्यात टळला आहे. या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे हे विमान तब्बल चार तास हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर अनेक प्रवासी रडत-रडत देवाकडे प्रार्थनाही करू लागले होते.

नेमके काय घडले? -
फ्लाईट IC3401 ने रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हुबळीसाठी उड्डाण केले. नियोजित वेळेनुसार हे विमान सायंकाळी ४:३० वाजता हुबळीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, विमान हुबळीजवळ पोहोचताच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे वैमानिकांनी लँडिंग न करता, सुरक्षित लँडिंगची तयारी करण्यासाठी हवेतच विमानाच्या घिरट्या घालण्याचा निर्णय घेतला.

प्रवासी भयभीत, नातलगांचा संताप - 
सुमारे चार तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा परिसरात हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान विमानात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते. तर अनेक जण रडत-रडत देवाला प्रार्थना करत होते. याशिवाय, प्रवाशांच्या नातलगांनीही एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला. एअरलाइन्सकडून वेळेवर आणि स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अखेर बेंगळुरूमध्ये सुरक्षित लँडिंग, प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला  -
अखेर, हे विमान बेंगळुरूकडे वळवण्यात आले आणि सायंकाळी ७:३० च्या सुमारास केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या यशस्वी लँडिंगनंतर प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

Web Title : Fly91 उड़ान में तकनीकी खराबी, 4 घंटे यात्री करते रहे प्रार्थना।

Web Summary : हैदराबाद से हुबली जा रही Fly91 की उड़ान तकनीकी खराबी के कारण चार घंटे तक हवा में चक्कर लगाती रही। यात्री डर गए और सुरक्षा के लिए प्रार्थना करने लगे। विमान अंततः बेंगलुरु में सुरक्षित उतरा, जिससे राहत मिली लेकिन सुरक्षा संबंधी चिंताएं बढ़ गईं।

Web Title : Fly91 flight faces technical snag, passengers pray during 4-hour ordeal.

Web Summary : A Fly91 flight from Hyderabad to Hubli narrowly avoided disaster after a technical fault forced it to circle for four hours. Passengers panicked, praying for safety. The flight eventually landed safely in Bengaluru, sparking relief but raising safety concerns.