५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:35 IST2026-04-22T15:34:09+5:302026-04-22T15:35:01+5:30
महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीचा अनुभव मिळेल.

५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
देशातील इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच दिग्गज इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने (Tesla) भारतीय बाजार आपली नवीन 'Model Y L' ही ६-सीटर लक्झरी SUV लाँच केली आहे. या नवीन कारची किंमत ६१.९ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टँडर्ड मॉडेल 'Model Y' पेक्षा सुमारे २ लाख रुपयांनी अधि आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीअस अनुभव मिळेल.
६ लोक आरामात प्रवास करू शकतात
या नवीन मॉडेलमध्ये ३०४० मिमीचा मोठा व्हीलबेस देण्यात आला आहे, यामुळे केबिनमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक जागा मिळते. 'Model Y' मध्ये प्रथमच तीन रांगांची आसनव्यवस्था देण्यात आली असून, यात ६ लोक आरामात प्रवास करू शकतात. दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्ससह अॅडजस्टेबल आर्मरेस्ट देण्यात आले आहेत. कारचे केबिन शांत ठेवण्यासाठी प्रगत साउंड इन्सुलेशन आणि प्रीमियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे, यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होतो.
टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास -
या कारमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे. ही SUV अवघ्या ५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग धारण करू शकते, तर हिचा टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास एवढा आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हिची रेंज. एकदा फुल चार्ज केल्यानतंर ही कार तब्बल ६८१ किलोमीटरपर्यंत (WLTP रेंज) धावू शकते. यामुळे एखादे कुटुंब दूरचा प्रवासही आरामत करू शकते.
खास टेक्नॉलॉजी अन् जबरदस्त फीचर्स -
या कारमध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टीम देण्यात आली आहे. जिच्य सहाय्याने कारचे बहुतांश फीचर्स नियंत्रित करता येतात. याशिवाय, अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि प्रगत सुरक्षा फीचर्स यांमुळे ही कार लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकते.