Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:34 IST2026-04-22T09:55:43+5:302026-04-22T10:34:22+5:30

अमेरिका-इराण युद्धविराम, बारामती पोटनिवडणूक यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घड�..

Maharashtra Marathi News Live Updates 22 April 2026: US Iran ceasefire, Donald Trump, Strait of Hormuz, West Bengal Election, Baramati Election, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, Pahalgam Terror Attack, Fuel Prices in India, Weather in Maharashtra | Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य

Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य

अमेरिका-इराण युद्धविराम, बारामती पोटनिवडणूक यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

22 Apr, 26 : 11:37 AM

पुरून ठेवलेला पुरुषाचा सापळा पोलिसांनी काढला बाहेर, मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारातील घटना

मेहकर जवळच असलेल्या जामगाव शिवारात एक अतिशय दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. जामगाव शिवारात काही वर्षापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह पुरलेला आहे..या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व त्यांचे पूर्ण सहकारी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व इतर सर्व टीम ने जेसीबीद्वारे जामगाव शिवारात एका ठिकाणी खोदकाम करून त्या ठिकाणी एका पुरुष जातीचा सापळा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिली आहे. 

22 Apr, 26 : 11:36 AM

खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची ६ तास चौकशी

नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित व्यावसायिक आणि खरात यांच्यातील जमीन व्यवहार तसेच अन्य बाबींचीही विचारपूस यावेळी करण्यात आली. शहरात मध्यंतरी वादग्रस्त ठरलेल्या आणि 'गोल्डन गँग' म्हणून चर्चेत असणाऱ्या कंपूमध्ये या हॉटेल व्यावसायिकाचा बोलबाला होता. वाचा सविस्तर

22 Apr, 26 : 11:29 AM

दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा

कधीकधी वेळ फक्त सरत नाही, तर ती आतपर्यंत जखम देऊन जाते. २२ एप्रिलची तारीख २६ कुटुंबांसाठी भयंकर ठरली आहे, त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसांना गमावलं. आज एक वर्ष उलटलं आहे, पण दुःख तसंच आहे. कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

22 Apr, 26 : 11:17 AM

जळगाव: ग्रामपंचायतीकडून मृत्यू दाखल्यांची ऑनलाइन नोंदच नाही; प्रकार उघड

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी सहीदाबी गुलामरसुल मण्यार यांच्या पतीचे दि. 15/08/2025 रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी खडकदेवळा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात नियमानुसार मृत्यूची नोंद केली होती. मात्र, ही नोंद फक्त ऑफलाइनच करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतीने तिची ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याचे उघड झाले आहे.

22 Apr, 26 : 10:34 AM

शांतता चर्चा सुरू असतानाच मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”

अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या शांतता बैठकीसाठी पााकिस्तान प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून असिम मुनीर यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेली नाकेबंदी आहे, ज्यामुळे इराण चर्चेसाठी इस्लामाबादला जाण्यास तयार नाही. असिम मुनीर यांनी ट्रम्प यांना माहिती दिल्याचे वृत्त असले तरी, काही तासांनंतर व्हाइट हाऊसच्या रिपोर्टरने सांगितले की, मुनीर यांनी होर्मुझ नाकेबंदीवर चर्चा केली नव्हती. 

22 Apr, 26 : 10:32 AM

“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा स्पष्ट संदेश

22 Apr, 26 : 10:23 AM

₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाचं कार्ड पुन्हा जारी म्हणजेच रिइश्यू झालं, तर जुन्या कार्डवर सुरू असलेले ई-मँडेट नवीन कार्डवर आपोआप ट्रान्स्फर केले जाऊ शकतील.

22 Apr, 26 : 10:22 AM

शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली

बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स ४७० अंकांनी खाली येत ७८,८०२ च्या पातळीवर व्यवहार करू लागला. निफ्टीमध्येही १२१ अंकांची घसरण होऊन तो २४,४५५ वर पोहोचला, तर बँक निफ्टी २०२ अंकांनी घसरून ५७,१६८ वर व्यवहार करत होता. 

22 Apr, 26 : 10:12 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला, होर्मुझवरूनही सुनावले

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरी, इराणने प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच, अमेरिकेने केलेली नौदल नाकेबंदी ही 'युद्धासाठी प्रवृत्त करण्याची कृती' असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

22 Apr, 26 : 10:08 AM

इराण-अमेरिका युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत संपण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पश्चिम आशियातील युद्धाचे ढग तूर्तास सरले असून राजकीय चर्चेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 22 April 2026: US Iran ceasefire, Donald Trump, Strait of Hormuz, West Bengal Election, Baramati Election, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, Pahalgam Terror Attack, Fuel Prices in India, Weather in Maharashtra