बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'

Virat Kohli News: एकीकडे IPL सुरू असताना एका वेगळ्याच कारणामुळे विराट चर्चेत आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:32 IST2026-04-22T11:23:45+5:302026-04-22T11:32:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
After Virat Kohli cut ties Bengaluru One8 Commune outlet shuts over rent dues | बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'

बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'

Virat Kohli News: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या IPL 2026 मध्ये खेळत आहे. त्याच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनेही RCB कडून खेळताना सहा सामन्यात २४७ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची यंदाच्या हंगामातील घोडदौड यशस्वीरित्या सुरू असताना एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आला आहे.

कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'!

बंगळूरुचे लोकप्रिय रेस्टॉरंट 'वन8 कम्युन' अखेर बंद करण्यात आले आहे. शहराच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार, मालकांवर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त भाड्याची आणि इतर देयकांची थकबाकी असल्याने हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले. या प्रकरणात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे एक प्रमुख नाव होते. पण त्याने या रेस्टॉरंटपासून स्वतःला पूर्णपणे दूर केले आहे. वृत्तानुसार, कोहलीने त्यांच्याशी असलेले व्यवसायिक संबंध तोडले आहेत. त्याने आपली तर भागीदारीच संपुष्टात आणली आहेच, पण त्यासोबतच रेस्टॉरंटमधून आपले 'वन8' हे ब्रँड नावही काढून टाकले आहे.

शुल्क, महसुलातील वाटा थकीत

हे रेस्टॉरंट 'ट्रायो हिल्स हॉस्पिटॅलिटी'द्वारे चालवले जात होते, ज्यांनी जवळपास सहा महिन्यांचे भाडे भरले नव्हते. देखभाल शुल्क आणि महसुलातील वाटा देखील थकीत होता. वारंवार नोटिसा बजावूनही, इमारतीच्या मालकाला अखेर न्यायालयात जावे लागले, ज्यानंतर न्यायालयाने रेस्टॉरंट बंद करण्याचा आदेश दिला.

आधीही सापडले होते वादात

हे रेस्टॉरंट यापूर्वीही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वादात सापडले होते. बृहत् बंगळूरु महानगरपालिकेने (बीबीएमपी) अग्निसुरक्षा आणि इतर नियमांसंदर्भात अनेक नोटिसा बजावल्या होत्या. सूत्रांनुसार, या समस्या आणि वारंवार आलेल्या तक्रारींमुळे कोहलीने या प्रकल्पापासून स्वतःला दूर केले होते. असे वृत्त आहे की, ब्रँडचे मूल्य घसरल्याने आणि ग्राहकांची संख्या कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला, ज्यामुळे तोटा वाढत गेला. सध्या, न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्व थकीत देयके भरेपर्यंत रेस्टॉरंट बंदच राहणार आहे.

वन८ कम्युन (One8 Commune) काय आहे?

मिळालेल्या वृत्तानुसार, वन८ कम्युन ही विराट कोहलीने स्थापन केलेली एक प्रीमियम रेस्टॉरंट आणि बार चेन आहे. हा ब्रँड दिल्ली (एरोसिटी), गुरुग्राम, पुणे, कोलकाता, नोएडा, बंगळूरू आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये आहे आणि तो त्याच्या जागतिक दर्जाच्या खाद्यपदार्थांसाठी आणि आलिशान अम्बियन्ससाठी प्रसिद्ध आहे. हा विराट कोहलीच्या वन८ (One8) ब्रँडचा एक भाग आहे आणि ट्रू पॅलेट हॉस्पिटॅलिटीच्या (True Palate Hospitality) भागीदारीत चालवला जातो.

Web Title : विराट कोहली ने कोर्ट के आदेश के बाद रेस्टोरेंट से तोड़ा नाता

Web Summary : विराट कोहली ने बकाया राशि के कारण बंद हुए 'वन8 कम्यून' रेस्टोरेंट से दूरी बना ली। बार-बार उल्लंघन और वित्तीय समस्याओं के बाद कोहली ने अपनी साझेदारी और ब्रांड एसोसिएशन समाप्त कर दिया। रेस्टोरेंट चेन पर बकाया किराए और अन्य देनदारियों का कोर्ट का आदेश था।

Web Title : Virat Kohli Cuts Ties with Restaurant After Court Order

Web Summary : Virat Kohli distanced himself from 'One8 Commune' restaurant after it faced closure due to unpaid dues. Kohli ended his partnership and brand association following repeated violations and financial issues. The restaurant chain, co-owned with True Palate Hospitality, faced court orders over unpaid rent and dues.