Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:54 IST2026-04-22T12:32:50+5:302026-04-22T12:54:10+5:30

Raja Shivaji Star Cast: 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात रितेशला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे.

'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शनही रितेशनेच केलं आहे. या ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली.

अभिनेत्री भाग्यश्री माँसाहेब जिजाऊंच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.

'राजा शिवाजी' सिनेमात अफजलखानच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दिसणार आहे.

या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बडी बेगमची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता फरदीन खानही 'राजा शिवाजी' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो शाहजहानच्या भूमिकेत आहे.

अभिनेते बोमन इराणी 'राजा शिवाजी' सिनेमात पीरबाबा ही भूमिका साकारणार आहेत.

'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानही दिसणार असल्याची चर्चा आहे. सलमान खान जिवा महालाची भूमिका साकारणार आहे.

'राजा शिवाजी' सिनेमा येत्या १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.