IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट

MS Dhoni Fitness Update, MI vs CSK IPL 2026: पहिल्या ६ सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही

हंगामाचे पहिले काही आठवडे चेन्नई सुपर किंग्ससाठी फारसे चांगले गेले नाहीत. संघाने आपले तीन स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी गमावले आहेत. त्यातच संघाला मैदानावर यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीमुळे सीएसके आणि त्याचे चाहते चिंतेत आहेत. तो दुखापतीमुळे एकही सामना खेळलेला नाही. पण मुंबई इंडियन्सच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी, धोनीच्या फिटनेसबाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे.

२३ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येतील. आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यातील हा सामना दरवर्षी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असतो.

यावर्षी तो अधिकच महत्त्वपूर्ण आहे. चेन्नई आणि मुंबईने या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. या सामन्यातील विजय हा त्यांच्यातील स्पर्धा आणि गुणतालिकेतील आपले स्थान अधिक मजबूत करण्याची एक संधी आहे.

MI vs CSK सामन्यासाठी सीएसकेला कर्णधार धोनीची गरज आहे. तो दुखापतीमुळे हंगामातील पहिले सहा सामने खेळू शकलेला नाही. पण या मोठ्या सामन्यापूर्वी धोनीने पुनरागमनाचे संकेत देऊन चाहत्यांना आनंदित केले आहे.

हे संकेत सीएसकेच्या सरावादरम्यान स्पष्टपणे दिसले. धोनीने सराव सत्रादरम्यान बराच वेळ फलंदाजी केली. परंतु फलंदाजीपेक्षाही आणखी एक बाब जास्त चर्चेत आले. सहसा धोनी सराव सत्रादरम्यान यष्टीरक्षण टाळतो.

यावेळी तो सामन्याच्या दोन दिवस आधी यष्टीरक्षण करताना दिसला. नेट्समध्ये त्याचा सराव हे दर्शवण्यासाठी पुरेसे आहे की त्याचा पाय पूर्णपणे ठीक आहे. त्याच्या गुडघ्यात कोणतीही वेदना नाही आणि तो पोटरीच्या समस्येतून सावरला आहे.