भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:51 IST2026-04-22T11:50:56+5:302026-04-22T11:51:27+5:30

Crime News:

Horrible! An argument broke out as soon as they left the classroom, an 8th grade student stuck a compass in another's eye | भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास

भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास

गेल्या काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमधील हिंसेचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना अहमाबादमधील महानगरपालिकेच्या एका शाळेत घडली आहे. येथे आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर त्यातील एकाने दुसऱ्याच्या डोळ्यात कंपास खुपसला. त्यामुळे जखमी झालेल्या या विद्यार्थ्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच अहमदाबाद स्कूल बोर्डाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परीक्षा संपल्यानंतर काही मिनिटांतच या विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद निर्माण झाला. याचदरम्यान, त्यातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर कंपासने हल्ला केला आणि त्याच्या डोळ्यात कंपास खुपसला. या घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालया दाखल केले. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.

शाळेच्या प्रभारी प्राचार्या लक्ष्मी शर्मा यांनी सांगितले की, २० एप्रिल रोजी सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्र््थ्यांचा सामाजिक शास्त्रांच्या विषयाचा पेपर होता. ११ वाजता पेपरची वेळ संपल्यावर विद्यार्थी वर्गातून बाहेर आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. तसेच या वादावादीदरम्यान, एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात कंपास खुपसला.

दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दक्षिण झोनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीमध्ये शाळेकडून कुठल्याही प्रकारची हलगर्जी झाल्याचं दिसून आलेलं नाही मुलांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता, हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.  

Web Title : भयानक! कक्षा के बाहर विवाद, आठवीं के छात्र ने आंख में घोंपा कंपास

Web Summary : अहमदाबाद के स्कूल में आठवीं कक्षा के दो छात्रों के बीच मामूली विवाद के बाद एक छात्र ने दूसरे की आंख में कंपास घोंप दिया। घायल छात्र अस्पताल में भर्ती, पुलिस जांच कर रही है। स्कूल प्रशासन ने जांच के आदेश दिए हैं। पूर्व विवाद की आशंका है।

Web Title : Horror! Argument After Class, Student Stabs Eye with Compass

Web Summary : Ahmedabad school: An eighth-grade student stabbed another student in the eye with a compass after an argument following a social science exam. The injured student was hospitalized, and police are investigating. School officials have also ordered an inquiry into the incident. A prior dispute is suspected.