’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:56 IST2026-04-22T12:53:56+5:302026-04-22T12:56:40+5:30
Pappu Yadav News: ९० टक्के महिला, नेत्याच्या रूममध्ये गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, असं विधान करत काँग्रेसचे सहयोगी खासदार पप्पू यादव यांनी वादाला तोंड फोडलं होतं. या विधानावरून पप्पू यादव यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतरही पप्पू यादव हे आपल्या विधानावर ठाम असून, त्यांनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
९० टक्के महिला, नेत्याच्या रूममध्ये गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, असं विधान करत काँग्रेसचे सहयोगी खासदार पप्पू यादव यांनी वादाला तोंड फोडलं होतं. या विधानावरून पप्पू यादव यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतरही पप्पू यादव हे आपल्या विधानावर ठाम असून, त्यांनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. देशातील ७० ते ८० टक्के नेते हे पोर्न व्हिडीओ पाहतात, असा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले पप्पू यादव म्हणाले की, देशातील ७० ते ८० टक्के नेते पोर्न पाहतात. हे मी सभागृहाच्या पटलामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. आता मला नोटिस पाठवणारे लोक कोण आहेत, ते कुणासोबत आहेत. माजी मंत्र्यांसोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. त्यामुळे जे लोक काचेच्या घरात राहतात, त्यांनी इतरांवर दगड फेकता कामा नये.
पप्पू यादव पुढे म्हणाले की, पुरुष नेते महिलांचं शोषण केल्याशिवाय त्यांना राजकारणात येऊ देत नाहीत, ही गोष्ट खोटी आहे का? मी महिलांसाठी लढाई लढत आहे. हे लोक महिलांचं शोषण करतात. ७५५ पुरुष नेत्यांविरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच १५५ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता मी जर पुरुष नेत्यांवर टीका केली तर त्यामुळे महिलांना त्रास होण्याचं कारण काय? हे नेते महिलांचं शोषण करतात आणि महिला आरक्षण विधेयकाच्या बाता मारतात, अशी टीकाही पप्पू यादव यांनी केली.