पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:54 IST2026-04-22T14:53:21+5:302026-04-22T14:54:03+5:30

Haryana Crime News: विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची आणि नंतर स्व:तही गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

Wife was talking on video call, husband saw, told son, 'Go watch TV', then... | पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...

पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...

विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची आणि नंतर स्व:तही गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दीपक नावाच्या तरुणाला त्याच्या पत्नीवर बऱ्याच दिवसांपासून संशय होता. तो तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. यादरम्यान, १९ एप्रिल रोजी दीपक राजस्थानमधील अलवर येथून गुरुग्राम येथील आपल्या घरी पोहोचला. घरी पोहोचताच त्याला सोनम ही किचनमध्ये उभी राहून कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचे दिसले. मात्र दीपकला पाहताच सोनम हिने फोन कट केला.

त्यावरून वादाला सुरुवात झाली. तसेच दीपकने सोनमकडे तिचा फोन मागितला. मात्र तिने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे दीपकचा संशय आणखीनच वाढला. तसेच रागाच्या भरात त्याने मागून जाऊन ओढणीने सोनमचा गळा आवळला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दीपकनेही गळफास लावून जीवन संपवले.

याबाबत घरातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना अत्यंत भयावह दृश्य दिसले. एकीकडे फरशीवर सोनमचा मृतदेह पडला होता. तर दुसरीकडे दीपकचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा या दोघांचाही १० वर्षांचा मुलगा घरी होता. तो दुसऱ्या खोलीत टीव्ही पाहत होता. त्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, आई आणि बाबांचं भांडण सुरू होतं. तसेच बाबांनी मला जा आणि टीव्ही पाहा, असे सांगितले होते, अशी माहिती त्याने दिली. आता पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे.  

Web Title: Wife was talking on video call, husband saw, told son, 'Go watch TV', then...