भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:37 IST2026-04-22T16:35:03+5:302026-04-22T17:37:09+5:30

आयआरजीसीने पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेलक्षेत्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते पश्चिम आशियातील अमेरिकेच्या मालकीची सर्व तेलक्षेत्रे नष्ट करतील, असे इराणने संकेत दिले आहेत.

US Israel Iran War IRGC attacks ship coming to India, seizes it and takes it to Iran | भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले

भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हल्ला करून दोन जहाजे ताब्यात घेतली आहेत. ही जहाजे इराणला नेली जात आहेत. यापैकी एक जहाज भारताकडे जात होते. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवरील एका अहवालानुसार, ही जहाजे एमएससी फ्रान्सिस्का आणि एपामिनोड्स असल्याचे ओळखले आहे. एमएससी फ्रान्सिस्कावर पनामाचा ध्वज आहे, तर एपामिनोड्सवर लायबेरियाचा ध्वज आहे.

नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम

जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, इराणने जप्त केलेले 'एपामिनोड्स' हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे जात होते. दुबईहून आपला प्रवास सुरू करून भारताकडे निघालेल्या या जहाजावर आयआरजीसीने हल्ला करून ते जप्त केले. भारतीय बंदराकडे जाणाऱ्या या जहाजाच्या जप्तीमुळे भारतात सागरी सुरक्षा आणि पुरवठा साखळीबाबत चिंता वाढली आहे.

जहाजे जप्त करण्याबाबत इराणने काय म्हटले?

इराणच्या नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, एमएससी-फ्रान्सिस्का आणि एपामिनोड्स ही दोन जहाजे आवश्यक परवानगीशिवाय कार्यरत होती आणि त्यांनी नेव्हिगेशन प्रणालीमध्ये फेरफार करून सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला होता. आयआरजीसी नौदलाने ती जप्त करून इराणी किनाऱ्यावर आणली. दोन्ही जहाजे सध्या इराणी सागरी हद्दीत असून, त्यावरील माल, कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची तपासणी केली जात आहे.

आयआरजीसीने पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेलक्षेत्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर पश्चिम आशियातील अमेरिकेच्या मालकीची सर्व तेलक्षेत्रे नष्ट केली जातील, असा इशारा इराणने दिला आहे.

Web Title : आईआरजीसी ने भारत जाने वाले जहाजों को जब्त कर ईरान ले गया

Web Summary : ईरान के आईआरजीसी ने दो जहाजों को जब्त किया, जिनमें से एक भारत के मुंद्रा बंदरगाह जा रहा था। एमएससी फ्रांसिस्का और एपामिनोड्स नामक जहाजों पर बिना अनुमति के संचालन और नेविगेशन सिस्टम में हेरफेर करने का आरोप है। इस कार्रवाई से भारत में समुद्री सुरक्षा और आपूर्ति श्रृंखलाओं के बारे में चिंता बढ़ गई है।

Web Title : IRGC Seizes Ships Bound for India, Takes Them to Iran

Web Summary : Iran's IRGC seized two ships, one en route to India's Mundra port. The vessels, MSC Francisca and Epaminodes, were allegedly operating without permits and manipulating navigation systems. This action raises concerns about maritime security and supply chains in India.