तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:23 IST2026-04-22T17:23:29+5:302026-04-22T17:23:43+5:30

सध्या बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून कडक सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशिन मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात येत आहेत.

Congress's fortunes in three states How many seats will it get Amit Shah's big prediction | तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!

तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या कामगिरीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. बंगालमध्ये काँग्रेसला आपले खातेही उघडता येणार नाही, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. दमदम येथील रॅलीत बोलताना, बंगालसोबतच तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही (केंद्रशासित प्रदेश) काँग्रेसची अवस्था बिकट असेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अमित शहा? -
यावेळी बोलताना अमित शाह यांनी दावा केला की, "मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. बंगालव्यतिरिक्त तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या दोन ठिकाणीही काँग्रेसचा आकडा दोन अंकी संख्येपर्यंत पोहोचणार नाही. अर्थात १० पेक्षा कमी असेल." दरम्यान त्यांनी मतदारांना आवाहन करताना शाह म्हणाले, हे मतदान केवळ भाजप सरकार किंवा आमदारासाठी नाही, तर घुसखोरमुक्त बंगालसाठी करा.

कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर पलटवार -
दुसरीकडे, ज्येष्ठ खासदार कपिल सिब्बल यांनी बंगालमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत केंद्रावर निशाणा साधला. बंगालमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती असून केंद्र सरकार राज्याच्या यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. भाजपने निवडणुकीसाठी गुजरातहून विशेष ट्रेनने ५००० लोक बंगालमध्ये आणल्याचा दावाही त्यांनी केला. 

सध्या बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून कडक सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशिन मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात येत आहेत.

 

Web Title : तीन राज्यों में कांग्रेस का सफाया? अमित शाह की बड़ी भविष्यवाणी

Web Summary : अमित शाह ने भविष्यवाणी की है कि पश्चिम बंगाल, तमिलनाडु और पुडुचेरी में कांग्रेस को संघर्ष करना पड़ेगा, शायद बंगाल में खाता भी न खुले। उन्होंने मतदाताओं से घुसपैठियों से मुक्त बंगाल का समर्थन करने का आग्रह किया। कपिल सिब्बल ने केंद्र सरकार की आलोचना की, राज्य मशीनरी के दुरुपयोग का आरोप लगाया।

Web Title : Congress Faces Wipeout in Three States? Amit Shah's Prediction

Web Summary : Amit Shah predicts Congress will struggle in West Bengal, Tamil Nadu, and Puducherry, possibly failing to even open its account in Bengal. He urged voters to support a Bengal free from infiltrators. Kapil Sibal criticized the central government, alleging misuse of state machinery.