WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:20 IST2026-04-22T19:19:44+5:302026-04-22T19:20:17+5:30

व्हॉट्सॲप वापरताय? तर सुरक्षिततेसाठी हे ७ महत्त्वाचे प्रायव्हसी फीचर्स नक्की वापरा.

Do you use WhatsApp? Then you must know these settings; 90% of people still don't use them! | WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!

WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर ती आपल्या आयुष्यातील वैयक्तिक माहितीची तिजोरी बनली आहे. खाजगी चॅट्स, फोटो आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण आपण व्हॉट्सॲपवरून करतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? आपण वापरत असलेल्या व्हॉट्सॲपमध्ये अशी काही खास प्रायव्हसी फीचर्स आहेत, ज्यांचा वापर ९० टक्के लोक करतच नाहीत. तुमची डिजिटल सुरक्षितता वाढवण्यासाठी ही फीचर्स जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमची ऑनलाइन उपस्थिती आता तुमच्या नियंत्रणात

अनेकदा आपल्याला वाटते की, आपण कधी ऑनलाइन येतो किंवा शेवटचे कधी सक्रिय होतो, हे कोणालाही कळू नये. यासाठी व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ‘Last Seen’ आणि ‘Online Status’ लपवू शकता. इतकेच नाही तर, तुम्हाला ज्यांना हे स्टेटस दाखवायचे आहे, अशा काही ठराविक लोकांसाठीच तुम्ही हे सेटिंग मर्यादित ठेवू शकता.

प्रोफाइल फोटो आणि 'About' माहितीची सुरक्षा

अनोळखी व्यक्ती तुमचा प्रोफाइल फोटो किंवा 'About' सेक्शन पाहू नये असे वाटत असेल, तर त्वरित हे सेटिंग बदला. 'Everyone' ऐवजी ते 'My Contacts' किंवा 'Nobody' वर सेट करा. यामुळे अनोळखी लोकांकडून होणारा गैरवापर टाळता येईल.

मेसेज वाचल्याचे समजणार नाही 

कधीकधी मेसेज वाचल्यानंतर समोरच्या व्यक्तीला लगेच उत्तर देणे शक्य नसते, पण 'ब्लू टिक'मुळे त्यांना समजते की आपण मेसेज वाचला आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही ‘Read Receipts’ बंद करू शकता.

चॅट लॉक आणि डिसअपिअरिंग मेसेज

संवेदनशील माहिती शेअर करत असाल, तर 'Disappearing Messages'चा वापर करा. यात ठराविक कालावधीनंतर मेसेज आपोआप डिलीट होतात. तसेच, आता 'चॅट लॉक' फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे खास वैयक्तिक चॅट्स पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटद्वारे लॉक करू शकता. इतकेच नाही तर संपूर्ण ॲप सुरक्षित ठेवण्यासाठी 'ॲप लॉक'चा वापर करा.

हॅकिंगपासून वाचण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन

तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' हे सर्वात महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. यात ६ अंकी पिन सेट करा, ज्यामुळे नवीन डिव्हाइसवर कोणीही तुमचे व्हॉट्सॲप हॅक करू शकणार नाही.

अनोळखी कॉल्सपासून सुटका

जर तुम्हाला वारंवार अनोळखी नंबरवरून कॉल्स येत असतील, तर 'Silence Unknown Callers' फीचर चालू करा. हे फीचर अनोळखी कॉल्स आपोआप सायलेंट करते, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते आणि मानसिक शांतताही मिळते. आजच आपल्या व्हॉट्सॲपची ही सेटिंग्ज तपासा आणि आपली डिजिटल ओळख सुरक्षित करा!

Web Title : WhatsApp गोपनीयता सेटिंग्स: इन छिपी सुविधाओं से अपना डेटा सुरक्षित रखें!

Web Summary : अपना WhatsApp सुरक्षित करें! ऑनलाइन स्टेटस, प्रोफाइल जानकारी और रीड रिसिप्ट्स छिपाएं। बेहतर गोपनीयता के लिए डिसएपियरिंग मैसेज, चैट लॉक, टू-स्टेप वेरिफिकेशन और अज्ञात कॉल करने वालों को साइलेंट करें।

Web Title : WhatsApp privacy settings: Protect your data with these hidden features!

Web Summary : Secure your WhatsApp! Hide online status, profile info, and read receipts. Use disappearing messages, chat lock, two-step verification, and silence unknown callers for enhanced privacy.