एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:12 IST2026-04-22T18:12:32+5:302026-04-22T18:12:57+5:30

20,000 flights canceled : एअरलाईन्सने २०,००० विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किमती आणि हॉर्मुझ नाकेबंदीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. सविस्तर वाचा.

Aviation sector in turmoil! Lufthansa airline suddenly canceled 20,000 flights; what happened...? | एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?

एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?

 

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. जर्मनीची प्रमुख एअरलाईन लुफ्थांसाने इंधनाचा खर्च नियंत्रित करण्यासाठी आपल्या २०,००० विमान फेऱ्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या चढ-उतारामुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे हवाई इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. इतक्या महागड्या दरात उड्डाणे चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे लुफ्थांसाचे मत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे इंधनाची पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे अनेक एअरलाईन्सचा इंधन साठा कमी झाला आहे. एअरलाईनने आपली आर्थिक स्थिती संतुलित करण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी ही रणनीती अवलंबली आहे.

प्रवाशांवर काय परिणाम होईल?
या निर्णयाचा परिणाम केवळ युरोपवरच नाही, तर भारत, आशिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांवरही होणार आहे. विमान फेऱ्या कमी झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअरलाईनने प्रवाशांना रिफंड किंवा पर्यायी विमानाचे बुकिंग देण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Aviation sector in turmoil! Lufthansa airline suddenly canceled 20,000 flights; what happened...?