Aviation Fuel Synthetic Blending: हवाई प्रवास अधिक स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या Aviation Turbine Fuel (ATF) संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, आता त्यामध्ये सिंथेटिक इंधन आणि इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम हवाई प्रवासाच्या खर्चावर, एअरलाईन्सच्या ऑपरेटिंग खर्चावर आणि पर्यावरणावर होण्याची शक्यता आहे.
सिंथेटिक आणि इथेनॉल ब्लेंडिंगला मंजुरी
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ATF नियमांमध्ये सुधारणा करत सिंथेटिक हायड्रोकार्बन आधारित इंधन आणि इथेनॉल ब्लेंडिंगला परवानगी दिली आहे. या बदलामुळे पारंपरिक इंधनासोबत स्वच्छ आणि टिकाऊ इंधनाचा वापर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने १७ एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे बदल Indian Standard IS 1571 आणि Indian Standard IS 17081 नुसार करण्यात आले आहेत.
The Petroleum and Natural Gas Ministry issued a fresh notification to align fuel definitions and regulatory provisions with evolving industry standards. Aviation Turbine Fuel (ATF) can now be blended with synthetic fuels under new rules. The move is aimed at bringing clarity to… pic.twitter.com/xxDZCYP4oT
— ANI (@ANI) April 22, 2026
नवीन नियम तात्काळ लागू
हे बदल आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यात आले असून, ते तात्काळ लागू झाले आहेत. त्यामुळे आता एअरलाईन्स आणि इंधन कंपन्या नवीन नियमांनुसार काम करू शकतात. यामुळे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूलचा वापर वाढण्यास मदत होईल.
जुने नियम वगळून नवे अपडेट
सरकारने या सुधारणेद्वारे काही जुने नियम आणि संदर्भ वगळले असून तपासणी आणि जप्ती संबंधित तरतुदी Bharatiya Nagarik Suraksha Sanhita नुसार अद्ययावत केल्या आहेत. यामुळे नियम अधिक स्पष्ट आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ATF महाग; VAT कमी करण्यावर चर्चा
दरम्यान, ATF च्या वाढत्या किंमतीमुळे सरकार चिंतेत आहे. नागरी उड्डयन मंत्रालय दिल्ली, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांसोबत ATF वरील VAT कमी करण्याबाबत चर्चा करत आहे. VAT कमी झाल्यास हवाई तिकीट स्वस्त होण्याची शक्यता आहे.
जागतिक तणावाचा परिणाम
पश्चिम आशायातील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे ATF च्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ATF दर २.०७ लाख रुपये प्रति किलोलीटरपेक्षा जास्त झाले आहेत. ICRA च्या अहवालानुसार, एअरलाईन्सच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात ATF चा वाटा ३०% ते ४०% इतका आहे. त्यामुळे इंधन दर वाढल्यास कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण येतो आणि तिकीट दर वाढवण्याची वेळ येते.
