गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 20:38 IST2026-04-20T20:32:37+5:302026-04-20T20:38:53+5:30
या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट देखील अगदी जवळ आली आहे.

आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देणाऱ्या स्ट्रिंग मेटाव्हर्स लिमिटेड (String Metaverse Ltd) च्या शेअरचे लवकरच विभाजन (Stock Split) करण्या येणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला एक शेअर १० भागांत विभागला जाणार आहे. या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट देखील अगदी जवळ आली आहे.

'String Metaverse Ltd' ने दिलेल्या माहितीनुसार, या विभाजनानंतर शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपयांवरून १ रुपया प्रति शेअरवर येईल. कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी २४ एप्रिल २०२६ ही तारीख 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडे असलेल्या एका शेअरच्या बदल्यात त्यांना १० शेअर्स मिळतील.

शेअरची कामगिरी - कंपनीचा शेअर सोमवारी ४.९५ टक्क्यांच्या घसरणीसह ७९.७० रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ६४ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली आहे. वर्षभरात शेअरचा भाव ८ टक्क्यांनी घसरला असून, त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३२४.३५ रुपये तर नीचांक ७९.७० रुपये इतका आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ९२७ कोटी रुपये आहे.

दीर्घकाळात गुंतवणूकदारांची चांदी - अल्पकाळात शेअर घसरला असला तरी दीर्घकाळात या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या ३ वर्षांत ५५१२% आणि ५ वर्षांत ३३३५% परतावा दिला आहे.

विशेष म्हणजे, ज्यांनी १० वर्षांपासून हा शेअर होल्ड केला आहे, त्यांना तब्बल ८६५८% एवढा बंपर परवातवा मिळाला आहे.

कंपनीत प्रवर्तकांचा (Promoters) हिस्सा ८१.७९% असून १८.२१% हिस्सा सार्वजनिक (Public) गुंतवणूकदारांकडे आहे. जून आणि सप्टेंबर तिमाहीत भागधारकांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















