Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!

IPL मधील पहिले शतक तेही विक्रमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:39 IST2026-04-20T21:36:17+5:302026-04-20T21:39:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL GT vs MI Mumbai Indians Star Tilak Varma Smashes Maiden IPL Hundred vs Gujarat Titans Equals Sanath Jayasuriya Fastest Century Record | Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!

Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!

Tilak Varma Maiden IPL Hundred : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला संकटातून बाहेर काढताना तिलक वर्मानं नाबाद आणि विक्रमी शतकी खेळी साकारली. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक ठरले. युवा बॅटरनं  ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह त्याने मुबई इंडियन्सकडून जलद शतकी खेळी करणाऱ्या सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अविश्वसनीय सेंच्युरी; कारण...

तिलक वर्मानंमुंबई इंडियन्सकडून संयुक्त सर्वात जलद शतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी घातली. खरंतर हा एक चमत्कारच आहे. कारण  पहिल्या २० चेंडूत त्याने फक्त १७ धावा काठल्या होत्या.  पुढच्या १० चेंडूत तो ३० धावांपर्यंत पोहचला. अशोक शर्माच्या एका षटकात ३ षटकार आणि २ चौकारासह त्याने २६ धावा कुटल्या. ३१ ते ४० चेंडूत त्याने धावगती आणखी वाढवली. या १० चेंडूत त्याने ३३ धावा केल्या. ४१ ते ४५ चेंडू दरम्यान २१ धावा करत त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.  पहिल्या २२ चेंडूत  ८६.३६ च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणाऱ्या तिलकनं पुढच्या २३ चेंडूत ३५६ च्या स्ट्राईक रेटनं धावा कुटल्या. ही त्याच्या पहिल्या शतकी खेळीतील खास गोष्ट ठरली.

GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...

MI साठी ठरला संकटमोचक

रबाडाच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडिन्सच्या संघाने पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना तिलक वर्मानं नमन धीरच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार  हार्दिक पांड्याच्या साथीनं ३८ चेंडूत ८१ धावांची भागीदारी करत त्याने MI ला संकटातून बाहेर काढले. शेवटपर्यंत मैदानात थांबत त्याने नाबाद शतकी खेळीसह मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ५ बाद १९९ धावा लावल्या.  

Web Title : तिलक वर्मा का पहला आईपीएल शतक, गुजरात के खिलाफ मुंबई इंडियंस को बचाया।

Web Summary : तिलक वर्मा के नाबाद शतक ने गुजरात टाइटन्स के खिलाफ मुंबई इंडियंस को बचाया। उनकी 45 गेंदों में 101 रनों की तेज पारी में 8 चौके और 7 छक्के शामिल थे। उन्होंने एमआई के लिए सबसे तेज शतक के सनथ जयसूर्या के रिकॉर्ड की बराबरी की, टीम को मुश्किल स्थिति से बाहर निकाला।

Web Title : Tilak Varma's maiden IPL century rescues Mumbai Indians against Gujarat.

Web Summary : Tilak Varma's unbeaten century rescued Mumbai Indians against Gujarat Titans. His rapid innings of 101 runs off 45 balls included 8 fours and 7 sixes. He equaled Sanath Jayasuriya's record for the fastest century for MI, pulling the team out of a difficult situation.