मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:52 IST2026-04-20T19:52:19+5:302026-04-20T19:52:36+5:30

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे.

A major earthquake in Middle Eastern politics America is no longer needed UAE's strong blow to Trump, controversy erupts over military bases | मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला

मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला


मध्यपूर्वेतील राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि अमेरिका यांच्यात गेल्या अनेक  दशकांपासूनच्या असलेल्या संबंधांना मोठा तडा जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अमिरातीचे प्रमुख रणनीतीकार अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधीन केले आहे. "UAE ला आता स्वसंरक्षणासाठी अमेरिकेची गरज नाही", असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे.

"आता अमेरिक लष्करी तळ 'ओझं'" -
अब्दुल खालिक अब्दुल्ला म्हणाले, "अमेरिकन लष्करी तळ आता सामरिक फायद्याऐवजी एक 'ओझे' बनले आहेत. इराणने डागलेली २८०० हून अधिक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे रोखून UAE ने स्वतःची संरक्षण क्षमता सिद्ध केली आहे. आम्हाला अमेरिकेकडून केवळ आधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण यंत्रणा हवी आहे, त्यांची कायमस्वरूपी फौज नको."

इराणने अमिरातीमधील 'अल मिन्हाद' या अमेरिकन कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामुळे, अमेरिकेच्या तळांमुळे आपण विनाकारणच इराणच्या निशाण्यावर येत आहोत, अशी भीती UAE मध्ये निर्माण झाली आहे.

UAE नेही अमेरिकेला दिली युआनची धमकी -
केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आघाडीवरही UAE ने ट्रम्प प्रशासनाला आव्हान दिले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर डॉलरचा पुरवठा थांबला. तर तेलाच्या व्यवहारासाठी आपण 'चीनी युआन'चा वापर सुरू करू. असा इशाराही UAE ने अमेरिकेला दिला आहे. एवढेच नाही तर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्याच्या निर्णयाने आर्थिक मंदी ओढवल्याचेही अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

Web Title : यूएई बोला, अमेरिका की ज़रूरत नहीं; अमेरिका-यूएई संबंध तनावपूर्ण।

Web Summary : यूएई के रणनीतिक सलाहकार का कहना है कि उसे अब रक्षा के लिए अमेरिका की ज़रूरत नहीं है, कथित ईरानी ड्रोन हमलों के बाद आत्मनिर्भरता का हवाला दिया गया। यूएई ने डॉलर की आपूर्ति बंद होने पर तेल व्यापार के लिए चीनी युआन का उपयोग करने की धमकी भी दी है, जो अमेरिकी प्रभाव को चुनौती दे रही है।

Web Title : UAE says it doesn't need US; strains US-UAE relations.

Web Summary : UAE strategic advisor says it no longer needs US for defense, citing self-reliance after alleged Iranian drone attacks. UAE also threatens to use Chinese Yuan for oil trade if dollar supply stops, challenging US influence.